सांगाेला, माढा, करमाळा, माळशिरससह पंढरपूरकरांसाठी Good News

lockdown released in pandharpur
lockdown released in pandharpur

पंढरपूर : पंढरपूरसह पाच तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने येत्या सोमवारपासून (ता. 20) पंढरपूर तालुक्यासह माढा, करमाळा, माळशिरस आणि सांगोला या भागातील सर्व दुकाने सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज (शुक्रवार) पंढरपुरात दिली. lockdown-released-pandharpur-madha-karmala-malshiras-sangola-sml80

lockdown released in pandharpur
संदेश येताच नाणेफेक करण्यापूर्वी न्यूझीलंडची पाकिस्तानात माघार

पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आॅक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री भरणे यांनी पंढरपूरसह पाच तालुक्यातील निर्बंध शिथील करत असल्याचे जाहीर केले. मागील काही दिवसांपासून या भागात कोरोना रुग्णांची संख्या अधिक होती. रुग्ण संख्या कमी कऱण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पंढरपूरसह पाच तालुक्यांत कडक निर्बंध घातले होते. यामध्ये चार वाजेपर्यंतच दुकाने सुरु ठेवण्यासाठी परवानगी दिली होती. त्यामध्ये बदल करुन आता सायंकाळी सहा वाजेपर्यंत सवलत देण्यात आली आहे.

स्थानिरक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने हाेणा-या सभा, मेळाव्यांना हाॅलच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. पाच तालुक्यातील निर्बंध शिथील lockdown released in pandharpur केल्याने या भागातील नागरिक व व्यापा-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com