लोह्यातील स्मशानभूमीने कात टाकली; फळा-फुलांची वृक्ष लागवड

स्मशानभूमी परिसरात फळा- फुलांची वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
लोह्यातील स्मशानभूमीने कात टाकली; फळा-फुलांची वृक्ष लागवड
लोहा येथील स्मशानभूमीने कात टाकली

लोहा (जिल्हा नांदेड) : शहरातील शिवाजी चौकालगत असलेली समशानभूमी पालिकेच्या माध्यमातून छान उभारली गेली मात्र अल्पावधीतच समशानभूमीच्या चहुबाजूनी काटेरी झुडपी वनस्पती वेढलेल्या होत्या. सर्वत्र घाण बजबजपुरी त्यामुळे मोठी दुर्गंधी सुटलेली होती. तालुक्यातील रायवाडी समशानभूमीच्या नंतरही स्मशानभूमी स्वच्छ सुंदर आणि यशस्वी करण्यात करण्यासाठी पुढाकार घेतला. Loha- cemetery -change- Planting- of -fruit-flowering- tree- nanded- news

वैजनाथ पांचाळ, तुकाराम पांचाळ आणि त्यांच्या सवंगड्यांनी सेवाभावी वृत्तीने या सगळ्या अतिक्रमीत काटेरी झुडपे काढून परिसर स्वच्छ केला. स्मशानभूमी परिसरात फळा- फुलांची वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. शहरातील नांदेड- लातूर मुख्य रस्ता, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय परिसर, मुक्ताईनगर, बालाजी मंदिराच्या पाठीमागील परिसर, सायाळ रोड, कंधार रोड या भागात वृक्षारोपण करुन यांना लोखंडी जाळ्या बसविण्यात येणार असल्याची माहिती स्वच्छता दूत राजीव तिडके यांनी दिली.

हेही वाचा - जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या एक हजार 906 एवढी झाली आहे.

'इनरव्हिल ' महिला संघटनासह स्वच्छता दूतांचा सहभाग

पर्यावरणाच्या वाढत्या ऱ्हासामुळे मानवापुढे शुद्ध हवेचे संकट 'आ ' वासुन उभे आहे. कोरोना काळात अनेकांना आॅक्सिजन वाचुन जीव गमवावा लागला. या संकटापासुन प्रेरणा घेऊन लोह्याच्या 'इनरव्हिल ' महिला संघटनासह त्यांच्या जोडीला स्वच्छता दूत राजीव तिडके, रामराव संगेवार यांनी पुढाकार घेऊन लोह्यातील वैकुंठ स्मस्मशानभूमी हरित सृष्टीसौंदर्य करण्याचा विडा उचलला आहे.

वृक्षमित्र परिवार यांच्या माध्यमातून लोहा शहरातील सार्वजनिक मोक्याच्या ठिकाणी फळे- फुले देणारे वृक्ष लागवड करण्यात पुढाकार घेत आहेत. वृक्षारोपण करुन त्यांना लोखंडी जाळी बसवण्यासाठी लोहा शहरातील डॉक्टर, शिक्षक, प्राध्यापक, सेवानिवृत्त कर्मचारी पुढाकार घेत आहेत. 'इनरव्हिल' महिला संघटनेच्या शोभा बागडे डॉ. सविता घंटे, डाॅ. मंजुषा जवळगेकर, डॉ. सारिका पवार, डॉ. संगीता ब्याळे, डॉ. राजश्री भोसीकर, रुक्मिणी गायकर, मंजुषा पारसेवार, संगीता गुजलवार, सविता सातेगावे, कल्पना कदम आदींनी गुलमोहर, सप्तपर्णी, बहाडोली जांभूळ, वटवृक्ष आणि चिंच, आवळा, आंबा, रॉयल पाम इत्यादी प्रकारच्या रोपवन तयार केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com