लोकमान्य टिळकांना प्रेरणा देणाऱ्या आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना संपन्न

लोकमान्य टिळकांनी आजोबा गणपतीची प्रेरणा...
लोकमान्य टिळकांना प्रेरणा देणाऱ्या आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना संपन्न
लोकमान्य टिळकांना प्रेरणा देणाऱ्या आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना संपन्न विश्वभूषण लिमये

सोलापूर : लोकमान्य टिळकांनी Lokmanya Tilak आजोबा गणपतीची Ajoba Ganpati प्रेरणा घेऊन, स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सव Ganeshotsav सुरू केला आहे. म्हणजेच आपल्या देशातील सर्वात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे श्रद्धानंद समाजाचा सार्वजनिक आजोबा गणपती होय. या गणपतीने 136 वर्ष पूर्ण केले आहेत. मोठ्या भक्तीमय वातावरणात या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

लोकमान्य टिळक 1985 मध्ये सोलापूरला Solapur आले होते. लोकमान्य टिळक यांची सोलापूरची महानगरपालिका Municipal Corporation असलेली 'इंद्रभुवन' ही देखणी वस्तू निर्माण करणारे कै.अप्पासाहेब वारद यांची घनिष्ठ मैत्री होती. लोकमान्य टिळक सोलापूरला आल्यावर त्यांचे वास्तव्य आप्पासाहेब वारद यांच्या निवासस्थानी असत. जुन्या फौजदार चावडी जवळ श्रद्धानंद समाजाचे सदस्य कै.पसारे यांच्या घरी पानसुपारी कार्यक्रमासाठी अप्पासाहेब वारद यांनी लोकमान्य टिळक यांना बरोबर नेण्यात आले.

शुक्रवार पेठेतील आजोबा गणपती आणि गणेश उत्सव समारंभात पानसुपारी कार्यक्रमासाठी एकत्रित येणारे नागरिक पाहून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना सुचली असे जुन्या पिढीतील लोकांकडून सांगण्यात येत आहे. सोलापुरातील आजोबा गणपतीची प्रेरणा घेऊन त्यानंतर 1893 मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवास सुरुवात करण्यात आली.

लोकमान्य टिळकांना प्रेरणा देणाऱ्या आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना संपन्न
गणपती सोबत एक रोपटे अन् कुंडी भेट! अमरावतीत दिला जातोय सामाजिक संदेश

स्वातंत्र्यपूर्व काळात आजोबा गणपती मंडळ हे इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी संघटित शक्ती देत होते. त्याप्रमाणेच आजच्या काळात राष्ट्रीय एकात्मता वाढवणारे कार्यक्रम हे मंडळ राबवित आहे. देशात अतिरेकी कारवाया रोज वाढत आहेत अशा प्रसंगी याची झळ सोलापूरला बसू नये, याची काळजी ही हे मंडळ सातत्याने घेत आहे. संपूर्ण वर्षभर सोलापूर शहराच्या कानाकोपऱ्यात या आजोबा गणपती मंडळाच्या माध्यमातून संपर्क सुरू असतो. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा या क्षेत्रातील मान्यवरांना सतत प्रेरणा देण्याचे कार्य आजोबा गणपती मंडळ करत असते.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com