Girish Mahajan News : मी सांगितलेला आकडा परफेक्ट असतो, भाजप राज्यात ४८ जागा जिंकेल : गिरीश महाजन

Political News : भाजप नेते गिरीश महाजन यांनी तर आता ४८ पैकी ४८ जागा जिंकण्याचा दावा केला आहे.
Jalgaon Girish Mahajan
Jalgaon Girish MahajanSaam tv

भूषण अहिरे

Dhule News :

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपने देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजप लोकसभा निवडणुकीत यश मिळवण्याचे अनेक दावे करताना दिसत आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांनी तर आता ४८ पैकी ४८ जागा जिंकण्याचा दावा केला आहे.

गिरीश महाजन यांनी म्हटलं की, लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप ४८ जागांचा आकडा क्रॉस करेल. मी सांगितलेला आकडा परफेक्ट असतो असंही मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं. कुणी सांगेल ४१, कुणी सांगेल ४२ पण मी सांगितलेला आकडा परफेक्ट असतो. धुळेकरांचा माझ्यावर विश्वास आहे, असं महाजन यांनी म्हटलं.

शेतकऱ्यांना मदत दिली जाईल

राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता, लवकरच अग्रीम मदत शेतकऱ्यांना दिली जाईल. उत्तर महाराष्ट्रात १०० वर्षात पहिल्यांदाच सरासरीपेक्षा इतका कमी पाऊस झाला आहे, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं.

मराठा आरक्षण

मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटील यांच्या आंदोलनात झालेल्या प्रकारानंतर विरोधकांनी राजकीय पोळी भाजण्याचे काम केले, असल्याचा गिरीश महाजन यांनी केला. मराठ्यांना आरक्षण न मिळण्यामागे उद्धव ठाकरेच दोषी आहेत. वटहुकूम काढण्याची भाषा करणारे उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना घरातून बाहेर देखील निघाले नाहीत, असा आरोप त्यांना केला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com