आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याबद्दल लोणीकरांचं वादग्रस्त विधान

राष्ट्रवादी कार्यकर्त्याकडून पोलिसांत तक्रार दाखल
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याबद्दल लोणीकरांचं वादग्रस्त विधान
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याबद्दल लोणीकरांचं वादग्रस्त विधानSaam Tv

जालना - राज्याचे माजी स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री आणि जालन्यातील परतूरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडत अतिवृष्टीचे नुकसान आणि पिकविम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. महावितरण कंपनीकडून बळजबरीने होणारी वीजबिल वसुली थांबवावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्या दालनात हे आंदोलन करण्यात आले.

हे देखील पहा -

शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याबद्दल भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना धारेवर धरत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याने नाराजी व्यक्त केली.यावेळी लोणीकरांनी पालकमंत्री राजेश टोपे हा राज्यपालांच्या पोटचा आहे का? असा सवाल जिल्हाधिकाऱ्यांना केला. त्यामुळे या प्रश्नातून लोणीकरांची जीभ घसरल्याच समोर आलं होतं.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याबद्दल लोणीकरांचं वादग्रस्त विधान
'मी माझ्या बापाचं नाव लावतो.. शाहरुख काय संपुर्ण बॉलिवूड माझं काही बिघडवू शकत नाही'

दरम्यान आता लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लोणीकर यांचा निषेध केला आहे.याशिवाय या प्रकरणी जालना पोलिसांत तक्रार देण्यात आली असून लोणीकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com