जालन्यात रुग्णांची लूट! दोन खाजगी रुग्णालयांवर गुन्हे दाखल

जालन्यात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून आतापर्यंत हजारो रुग्णांनी वेगवेगळ्या आजारांवर उपचार घेतले.
जालन्यात रुग्णांची लूट! दोन खाजगी रुग्णालयांवर गुन्हे दाखल
जालन्यात रुग्णांची लूट; दोन खाजगी रुग्णालयांवर गुन्हे दाखल Saam Tv

जालना: महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून (Mahatma Phule Jan Arogya Yojana) रुग्णांवर उपचार केलेले असताना देखील रुग्णांकडून पैसे घेतल्याचा प्रकार जालन्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. एका महिला रुग्णाच्या पतीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हॉस्पिटलच्या डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलिसांनी थेट हॉस्पिटल विरोधात गुन्हा दाखल न करता महात्मा ज्योतिबा फुले सनियंत्रण समितीच्या चौकशीनंतरच गुन्हा दाखल करावा असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

जालन्यात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून आतापर्यंत हजारो रुग्णांनी वेगवेगळ्या आजारांवर उपचार घेतले. मात्र वर्षभरात जालन्यातील काही खाजगी रुग्णालयांनी या योजनेतून रुग्णांवर उपचार करून रुग्णांवर मोफत उपचार करण्याऐवजी त्यांच्याकडून देखील पैसे उकळल्याच्या ७५ तक्रारी वर्षभरात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सनियंत्रण समितीकडे दाखल केल्या गेल्या आहे.

जालन्यात रुग्णांची लूट; दोन खाजगी रुग्णालयांवर गुन्हे दाखल
भेसळयुक्त रेमडेसिवीर वापरले; डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही पोलिसांकडून दाखल झालेला गुन्हा चुकीच्या पद्धतीने दाखल झाल्याचं सांगितलं आहे. दरम्यान राजेश टोपे यांनी पोलिसांकडून हॉस्पिटलवर दाखल झालेला चुकीच्या पद्धतीने दाखल झाला असल्याचं सांगितलं असलं तरीही मग तक्रार दराने जायचं कुठं असा सवाल उपस्थित करत पोलीस कारवाईचं समर्थन केले आहे. शिवाय पोलिसांची कारवाई योग्य असल्याचं म्हटलं आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून रुग्णांना मोफत सेवा मिळावी हा राज्य सरकारचा हेतू आहे. पण रुग्णालये या योजनेचा रुग्णांना लाभ देऊन त्यांच्याकडून देखील पैसे उकळत आहेत. हे कटू सत्य आहे. पण जिल्हा स्तरावरील सनियंत्रण समिती याकडे दुर्लक्षच करताना दिसत आहे. त्यामुळे पोलीसांनी केलेल्या कारवाईत चुकीचं काय असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com