Latur News: आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक नसल्याने २८ हजार सदस्यांचे नुकसान; अनेकांवर आली उपासमारीची वेळ

प्राधान्यच्या ३९२६८१ पैकी ३६८२७४ सदस्यांची आधार जोडणी रखडलेली आहे.
Latur News
Latur NewsSaam TV

दीपक क्षीरसागर

Latur News: कोणतेही कुटुंब अन्नधान्यापासून वंचित राहू नये यासाठी शासनाकडून स्वस्त धान्य दुकानातून रेशनचे वितरण केले जाते. मात्र, नवीन नियमानुसार रेशन कार्डशी आधार क्रमांक जोडणे आवश्यक आहे. त्यानुसार लातूर तालुक्यातील २८ हजार १५५ जणांनी आपले आधार रेशन कार्डशी जोडलेले नाही. त्यामुळे तातडीने आधार रेशन कार्डशी जोडण्याचे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे. (Latest Marathi News)

गोरगरीब नागरिकांना अन्नधान्य उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य शासनाच्या वतीने सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अल्प दरात धान्य पुरवठा केला जातो. यासाठी प्रत्येक लाभार्थ्याच्या रेशन कार्डाला आधार क्रमांक लिंक करणे बंधनकारक आहे. मागील दोन वर्षांपासून तहसील प्रशासनाच्या पुरवठा विभागाकडून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार अंत्योदयच्या ४६ हजार २१ पैकी ४२ हजार दोनशे ७३ सदस्यांनी आधार जोडणी केली आहे. तर प्राधान्यच्या ३९२६८१ पैकी ३६८२७४ सदस्यांची आधार जोडणी रखडलेली आहे. तातडीने आधार जोडणी करण्याचे आवाहन आहे.

Latur News
Latur Breaking | ड्रॅगन बोट चालवण्यात लातूरच्या कन्या अव्वल

असे करा रेशन कार्ड आधारला लिंक

रखडलेल्या गोरगरीब कुटुंबीयांना यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. काहींवर तर उपासमारीची देखील वेळ आली आहे. आधार कार्ड रेशन कर्डशी लिंक करण्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. यासाठी सर्वात आधी तुमच्या रेशन दुकानाला किंवा पीडीएस कार्यालयाला भेट द्या. यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड यांची झेरॉक्स कॉपी तसेच कुटुंब प्रमुखाचे २ पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहेत.

Latur News
Latur News : थंडी वाजू लागली म्हणून पठ्ठ्या थेट रेल्वेखाली झोपला; भयानक घटना घडणार होती इतक्यात...

तसेच तुमच्या आधार कार्डशी (Aadhar Card) लिंक असलेल्या बॅंक (Bank) खात्याचे पासबुकची झेरॉक्स कॉपी रेशन दुकानात जमा करा. यात तुम्हाला तुमचे फिंगर प्रिंट देखील द्यावे लागेल. त्यानंतर आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. जेव्हा तुम्ही ही सर्व प्रक्रिया पूर्ण कराल त्यानंतर ७ दिवसांच्या आत तुमचे आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक झाल्याचा एसएमएस तुमच्या लिंक असलेल्या मोबाईल नंबर येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com