औरंगाबादमध्ये लॉटरी-जुगाराच्या दुकानांनी तरुणांचं आयुष्य उध्वस्त; वाचा सविस्तर

औरंगाबाद शहरात सध्या गल्लोगल्ली आणि रस्त्या-रस्त्यांवर लॉटरी आणि जुगाराची दुकानं थाटली आहेत.
Lottery Shop
Lottery ShopSaam TV

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात सध्या गल्लोगल्ली आणि रस्त्या-रस्त्यांवर लॉटरी आणि जुगाराची दुकानं थाटली आहेत. यातून हजारो तरुणांचं आयुष्य उध्वस्त होतंय, तर दुसरीकडे बेकायदा लॉटरी, जुगाराच्या धंद्यातून लाखोंची उलाढाल होत आहे. मात्र, हे अड्डे चालवणाऱ्यांना पोलीसांची किंवा संबंधित अधिकाऱ्यांची भीती वाटत नाही. औरंगाबादच्या गल्लीबोळात सुरू असलेल्या या लॉटरी आणि जुगाराच्या अड्ड्याने अनेक तरुणांचं आयुष्य उध्वस्त केलं आहे. अनेक तरुण, कामगार, कष्टकरी हे लॉटरी आणि जुगाराच्या विळख्यात अडकल्यानं त्यांच्या कुटुंबांची वाताहत होत आहे. काही जण यातून उध्वस्त झालेत. मात्र, काही राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप, प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हे अड्डे गल्लोगल्ली वाढत आहेत. त्यात अनेक तरुण, गरीब घरची मुलं यात अडकत चालली आहेत.

औरंगाबाद शहरात (Aurangabad City) ऑनलाईन लॉटरी, जुगाराचे हे अड्डे थोडे-थोडके नाहीत, तर १०० पेक्षा अधिक दुकानं सर्रासपणे सुरु असतात. हा खुलेआम धंदा आणि यातून लाखोंची उलाढाल ही सर्वश्रुत आहे. मग पोलीस (Police) अधिकाऱ्यांना गल्लोगल्ली, रस्त्या-रस्त्यांवर सुरू असलेले हे अड्डे का दिसत नाहीत, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. हे अड्डे कायम का बंद होत नाहीत?, त्यात कधीतरी छापा मारल्याचे, कारवाई केल्याचं पोलीस का दाखवतात असा प्रश्न आहे. आणि पोलिसांचं उत्तरही या काळ्या धंद्याला मूक समंती देते, हे दिसून येतं.

Lottery Shop
पहिल्याच प्रयत्नात UPSC पास; बीडच्या शेतकऱ्याची मुलगी राज्यात पहिली

हे ऑनलाइन जुगार, लॉटरी, गेम, मॅच खेळण्यासाठीचे अड्डे हे पोलिसांच्या आशिर्वादमुळे बोभाटपणे सुरू असल्याचं खासदार इम्तियाज जलील सांगत आहेत. ज्यांना यातलं काही माहीत नाही, त्यांना हे अड्डेवाले परवानाधारक असल्याचा दावा करतात. यात नवनवीन तंत्र आणून लोकांची लाखोंची फसवणूक केली जातेय. बेकायदेशीररीत्या ऑनलाइन लॉटरी सेंटरमध्ये फॅन्टसी ११ सॉप्टवेअर ॲप्लिकेशन आणि इनफिनिटीइमॅक्स कॉम या वेबसाइटचा वापर करून जुगार खेळविला जातोय. यात जीएसटी कोणी भरत नाही. ना कोणता कर. इथे फक्त गरिबांची, तरुणांची फसवणूक करून लाखोंचे खिसे भरणाऱ्यांची संख्या वाढलीय.

हास्यास्पद म्हणजे ऑनलाइन लॉटरी आणि जुगार अड्ड्यावर सायबर गुन्हे शाखेने १३ डिसेंबर रोजी सिडकोमध्ये छापा मारून ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. फक्त ९ जणांना अटक केलीय. मग शंभरापेक्षा जास्त दुकानाचे चालक मालक पोलिसांना सापडत का नाहीत, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत. त्यामुळे औरंगाबाद शहरातील तरुणांचे आणि गोरगरीब कुटुंबाचे आयुष्य उध्वस्त करायचे नसतील तर गृहमंत्रालयाचा यामध्ये लक्ष घालावे लागेल, त्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. कारण इथली सगळी व्यवस्था या काळ्या धंद्याच्या अड्डामध्ये आकंठ बुडाली याच दिसून येतंय.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com