
Maharashtra Weather News : राज्यभरात थंडीची लाट वाढतच चालली आहे. मंगळवारी हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जळगावात सर्वाधिक कमी तापनमानाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईकर देखील थंडीने गारठले आहेत. उत्तरेकडून थंड वारे वाहू लागल्याने संपूर्ण राज्यात कडाक्याची थंडी जाणवत आहे. जळगाव, धुळे, निफाड या ठिकाणी थंडीने अनेक व्यक्ती आजारी पडल्या आहेत. जळगावात ५.३ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. याचा परिणाम मुंबईमध्येही दिसत आहे. गेल्या २ दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत असल्याने याचा परिणाम वाहतुकीवरही झाला आहे. दाट धुक्यांमुळे विमान आणि ट्रेन धीम्या गतीने सुरू आहेत. (Latest Weather News)
संपूर्ण राज्यभरातील किमान तापमान खाली घसरले आहे. त्यामुळे सर्वत्र जास्त गारठा जाणवत आहे. सकाळी ६ ते ७ पर्यंत धुक्याची चादर पसरलेली दिसत आहे. सरासरी तापमानापेक्षा पारा खाली घसरल्याने जळगावकरांना बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे. ३१ डिसेंबर आधी राज्यात असाच थंडीचा तडाखा बसला होता. मात्र नंतर काही दिवस वातावरणात थोडी उष्णता जाणवू लागली होती. अशात आता पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडल्याने ओझरमध्ये १२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
काश्मिरमध्ये झालेली बर्फवृष्टी आणि उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे १३ जिल्ह्यांमध्ये पुढचे काही दिवस आणखीन थंडी वाढण्याची शक्यता आहे. निफाडमध्ये ४.७ अंश सेल्सिअसवर तापमान घसरले आहे. औरंगाबादमध्येही पारा घसरला असून ५.८ अंशाची नोंद करण्यात आली आहे. ५५ वर्षांनंतर औरंगाबादमध्ये तापमानात एवढी घट झाली आहे.
मुंबईत आज १७ अंश तापमान आहे तर पुढचे दोन ते तीन दिवस १६ ते १८ अंशावर तापमान पोहचणार असल्याचे हवामानखात्याने म्हटले आहे. तसेच मकरसंक्रांतीपर्यंत मुंबईतल्या तापमानात आणखीन घट होऊन १५ अंशापर्यंत घसरण होण्याची शक्यता आहे. पालघर, अलिबाग, डहाणू या ठिकाणी १८ ते २० अंशापर्यंत तापमानाची नोंद झाली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.