मुलाला अधिकारी केलं; अन् आई थांबली नाही..

राज्य गुप्तवार्ता विभागात अधिकारी पदावर रुजू झालेले पाचपिंपळी येथील रहिवासी गणेश विठ्ठल वाघमारे
मुलाला अधिकारी केलं; अन् आई थांबली नाही..
मुलाला अधिकारी केले. मात्र आईचे निधन झाल्याने हळहळ

नांदेड : आयुष्यभर शेती, कुटुंब सांभाळत, परिस्थितीशी चारी हात संघर्ष करत आपल्या एकुलत्या एक मुलाला अधिकारी बनविणाऱ्या आईने, सुखाचे चार दिवस न पाहताच बुधवारी (ता. सात जुलै) जगाचा निरोप घेतला, ही हृदयद्रावक घटना बिलोली तालुक्यातील पाचपिंपळी येथे घडली.

राज्य गुप्तवार्ता विभागात अधिकारी पदावर रुजू झालेले पाचपिंपळी येथील रहिवासी गणेश विठ्ठल वाघमारे यांच्या मातोश्री राधाबाई विठ्ठलराव वाघमारे ( वय 65 ) यांचे दुर्धर आजाराने बुधवारी पाचपिंपळी येथील राहत्या घरी निधन झाले. गत महिन्याभरापासून त्या आजाराशी झुंज देत होत्या.

आयुष्यभर कष्ट करत आपला मुलगा अधिकारी झालेला पाहण्याची जिद्द या आईने पूर्ण केली खरी पण मोठ्या संघर्षानंतर आलेले सुखाचे दिवस या मातेला नियतीने पाहू दिले नाही.

हेही वाचा - पावसाने दडी मारल्याने शेतकरी कावडीने पाणी आणुन जगवतोय भातपिक!

डॉक्टरांनी महिनाभर शर्थीचे प्रयत्न करुनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. राधाबाई वाघमारे यांच्या पश्चात पती, तीन मुली, एक मुलगा, नातू, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पाचपिंपळी, कासराळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com