Mahabaleshwar News : महाबळेश्वर, पाचगणी धोक्यात? जोशीमठ सारखंच भूस्खलन होऊ शकतं, तज्ज्ञांच्या इशाऱ्यांने चिंता वाढली

जोशीमठ आणि पाचगणी या दोन्ही ठिकाणी साधर्म्य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
Pachgani
PachganiSaam TV

>> ओंकार कदम

सातारा : उत्तराखंडमधील जोशीमठ येथील स्थिती चिंताजनक आहे. याठिकाणी भूस्खलनाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना आपलं घरदार सोडून तेथून स्थलांतरित व्हावं लागत आहे. जोशीमठ सारखीच स्थिती राज्यातील पाचगणी, महाबळेश्वर येथे निर्माण होऊ शकते, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जोशीमठ या ठिकाणी जे भूस्खलन झाले आहे त्याच पद्धतीची परिस्थिती सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण पाचगणी भागात देखील होऊ शकते, असा इशारा भूगर्भ शास्त्रज्ञांनी यांनी दिला आहे. जोशीमठ आणि पाचगणी या दोन्ही ठिकाणी साधर्म्य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. (Latest News Update)

Pachgani
Maharashtra Weather : पुढचे काही दिवस राज्यात हुडहुडी कायम; गोंदियामध्ये तापमानात सर्वाधिक घसरण

जोशीमठप्रमाणे पाचगणी भागात देखील मानवी हस्तक्षेप वाढला आहे.मोठ्या प्रमाणात डोंगर उतारावर पाचगणी भागात अनाधिकृत बांधकामे निर्माण झाली आहेत. त्यामुळेच भविष्यात पाचगणी भागात सुद्धा भुस्खलनाचा प्रकार घडण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.

पाचगणी प्रमाणेच महाबळेश्वर,भीलार या डोंगर उतारावर असणाऱ्या गावांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात डोंगर उतारावर बांधकामे झाली आहेत. त्यामुळे भविष्यात या ही ठिकाणी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Pachgani
Maharashtra Politics : ज्यांना घर सांभाळता येत नसेल त्यांनी घर फोडण्याचे आरोप करू नये; खासदार विखेंचा नाना पटोलेंना टोला

ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी म्हटलं की विकासाच्या नावाखाली सुरू असलेली बेसुमार बांधकामे,धरणांची निर्मिती, बेकायदा खाणी या सगळ्याचा परिणाम म्हणजे जोशीमठ मधील दुर्घटना आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाट देखील त्याच मार्गावर आहे. महाबळेश्वर पाचगणीसह अनेक ठिकाणी धोकादायक म्हणावी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे रस्ते निष्काळजीपणे बांधले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com