Venna Lake: बाेटींग बंद; महाबळेश्वर पालिकेचा निर्णय

नागरिकांनी विना मास्क बाहेर पडू नये अन्यथा दंडात्मक कारवाईस सामाेरे जावे लागेल असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
Mahableshwar Venna Lake Boating
Mahableshwar Venna Lake Boatingsaam tv

सातारा : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे महाबळेश्वर (mahableshwar) पालिका प्रशासनाने वेण्णालेक बोट क्लब आजपासून (रविवार) बंद केला आहे. याबाबतची माहिती विठ्ठल जाधव (बोट व्यवस्थापन कर्मचारी) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (mahableshwar muncipal council closed boating of venna lake)

Mahableshwar Venna Lake Boating
Big Boss 15: बाब्बाे! गप्प बसेल ताे अभिजीत बिचुकले कसला; भाईजानवर डाफरला

गेल्या आठ दिवसांपासून सातारा (satara) जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. याचा फटका महाबळेश्वर (mahableshwar) येथील पर्यटनाला बसला आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळे महाबळेश्वर येथील प्रसिद्ध असा वेण्णालेक बोट क्लब (Mahableshwar Venna Lake Boating) महाबळेश्वर पालिका प्रशासनाने आजपासून बंद केला आहे.

आज रात्रीपासून पर्यटन स्थळावर कोरोना (coronavirus) बाबतची नवीन नियमावली लागू करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून प्रादुर्भाव वाढू नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. नागरिकांनी विना मास्क (mask) बाहेर पडू नये अन्यथा दंडात्मक कारवाईस सामाेरे जावे लागेल असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com