Weekend Lockdown : पर्यटकांनाे! महाबळेश्वरात गर्दी टाळा : सिंह

Weekend Lockdown : पर्यटकांनाे! महाबळेश्वरात गर्दी टाळा : सिंह
Mahableshwar Shekhar Sinh Appeals To Avoid Crowd

सातारा : सातारा जिल्ह्यात काेविड 19 पॉझिटिव्हिटी रेट covid19 positivity percentage वाढत असल्यामुळे सातारा जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्णयाबाबत जिल्ह्यातील व्यापारी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ असणाऱ्या महाबळेश्वर - पाचगणी mahableshwar panchgani येथे देखील कडक निर्बंध लागू असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी प्रशासनास नुकतेच निवेदन दिले. या निवेदनात माथेरान सारखी वेगळी नियमावली जाहीर करा अशी मागणी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अशी कोणतीही नियमावलीचा आदेश सध्यातरी राज्य सरकारकडून आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे नियमांत बदल हाेणार नाही असेही स्पष्ट करुन वीकेंड लाॅकडाउन काऴात पर्यटस्थळावर नागरिकांनी गर्दी टाळावी असे आवाहन केले आहे. (mahableshwar-panchgani-traders-demands-unlock-shekhar-sinh-appeals-avoid-crowd-tourism-place)

सातारा जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी संचारबंदी काळात बाहेर फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संचारबंदीच्या काळात नियमबाह्य वागणा-यांवर कठाेर कारवाई केली जाणार असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. दरम्यान लाॅकडाउन उठले नाही तर बाजारपेठ खूली करु अशी आराेळी ठाेकणा-या महाबळेश्वरातील व्यापारी वर्गाने यु टर्न घेत प्रथम जिल्हाधिका-यांची भेट घेण्याचे ठरविले आहे. परिणामी आज (शुक्रवार) महाबळेश्वरात केवळ अत्यावश्यक सेवेतील व्यवहार दुपारी दाेन वाजेपर्यंत सुरु हाेते.

महाबळेश्वरातील व्यावसायिकांनी आज (शुक्रवार) बाजारपेठेतील दुकाने उघडू असे जाहीर केले हाेते परंतु तसे न करता शिष्टमंडळाच्या माध्यमातून साता-यात जाऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेवून त्यांना आमच्या मागण्यांचे निवेदन देणार असल्याचे व्यापा-यांनी स्पष्ट केले. यामुळे प्रशासन आणि व्यावसायिकांची हाेणारी गरमागरमी टळली.

यापुर्वी महाबळेश्वर शहरातील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता.30) प्रांताधिकारी संगिता राजापुरकर यांची तर मंगळवारी (ता.1) पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील व नायब तहसिलदार श्रीकांत तिडके यांची भेट घेवुन त्यांना मागणीचे निवेदन सादर केले हाेते.

या निवेदनात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी यांनी जिल्हयात पुन्हा लॉकडाउन जाहीर केला. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठेतील इतर सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. या निर्णया मुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे. महाबळेश्वर तालुक्याचा रूग्णवाढीचा दर सर्वात कमी आहे असे असताना इतर तालुक्यांच्या रूग्णवाढीचा फटका महाबळेश्वर तालुक्याला बसत आहे. महाबळेश्वर हे शहर पर्यटन स्थळ असुन येथे पर्यटकांची आवक सुरू झाली आहे.

येथे येणारा पर्यटक हा आपली कोरोना टेस्ट करूनच येत आहे. त्याच प्रमाणे त्याच्याकडे तपासणी केल्याचे प्रमाणपत्र पाहुनच त्यांना महाबळेश्वर येथील हॉटेल व लॉजमध्ये प्रवेश दिला जातो. त्यामुळे मागील दहा दिवसात हजारो पर्यटक येवुनही महाबळेश्वर येथील कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाली नाही. या सर्व बाबींचा जिल्हा प्रशासन विचार करून बाजार पेठेवरील निर्बंध हटविले पाहिजे व बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली.

Mahableshwar Shekhar Sinh Appeals To Avoid Crowd
Lockdown : साता-याचे जिल्हाधिकारी बनले कठाेर; 'आराेग्य' ला ताकीद

यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे, नगरसेवक किसनराव शिंदे, प्रकाश पाटील, संदीप साळुंखे, रविंद्र कुंभारदरे, विशाल तोष्णीवाल, अतुल सलागरे, महेश कोमटी, इरफान शेख, असिफ सय्यद, तौफिक पटवेकर, महेश गुजर, मनोज ताथवडेकर, बाळकृष्ण साळुंखे, अभिजीत खुरासणे, सचिन वागदरे, रामदास जाधव, संतोष जंगम आदी मान्यवर उपस्थित होते.

शिष्टमंडळाने येथील तहसिल कार्यालयात उपस्थित असलेले नायब तहसिलदार श्रीकांत तिडके यांची भेट घेवुन त्यांचे बरोबर चर्चा केली व त्यांनाही महाबळेश्वर बाजारपेठेतील व्यापारी यांच्या मागणीचे निवेदन सादर केले हाेते.

कोरोनाच्या दोन लाटांमुळे महाबळेश्वरचे पर्यटनस्थळ हे गेली 18 महीने बंद होते. या काळात येथील सर्वसामान्य व्यापारी, घोडे व्यवसायिक, टॅक्सी चालक, मालक, हातगाडी धारक, टपरीवाला, पथारीवर बसुन व्यवसाय करणारे, कणसे विक्री करणारे अशा सर्वच घटकांना बेरोजगारीचा सामना करावा लागला आहे. या सर्वांची आर्थिक स्थिती ही डबघाईला आली आहे अशा वेळी या सर्वांचा विचार प्रशासनाने करावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com