
Mahadev Jankar On BJP Seat Distribution: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपा बाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये शिंदे गटाला फक्त ५० जागा देणार असल्याचं ते बोलत आहेत आणि नंतर लगेच सारवासारव करताना दिसत आहेत. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर आता त्यांचाच घटकपक्ष असलेला राष्ट्रीय समाज पक्षने आक्रमक भूमिका घेतली आहे.
शिंदे गट आणि भाजप एकत्र मिळून आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूक लढणार असल्याचे दिसत आहे. त्यांना आम्हाला सोबत घेण्याची इच्छा दिसत नाही. त्यांना आम्हाला सोबत घ्यायचं नसेल तर हरकत नाही. आम्ही स्वबळावर लढू, अशी भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी मांडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागा वाटपाच्या विधानावरुन सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. एकीकडे शिंदे गटाचे आमदारही त्यांच्या या वक्तव्यावरुन निशाणा साधत असताना आता रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनीही यावर आक्रमक भूमिका घेत स्वबळाचा नारा दिला आहे.
काय म्हणाले महादेव जानकर
"महाराष्ट्रात रासपचे आतापर्यंत चार आमदार झाले. आता आम्ही दोन आमदार आहोत. मी विधान परिषदेचा सदस्य आहे. राज्यातील 98 जिल्हा परिषदा आमच्याकडे आहेत. आसाम आणि कर्नाटकात एक जिल्हा परिषद आमच्या ताब्यात आहे. गुजरातमध्ये रासपचे 28 नगरसेवक आहेत. चार राज्यात रासपला मान्यता मिळाली आहे. तरीही भाजपला आमची गरज वाटत नसेल तर आम्ही स्वतंत्र लढणार आहोत," असे महादेव जानकर यांनी सांगितले आहे. (Maharashtra Politics)
तसेच याबद्दल पुढे बोलताना त्यांनी, "जिथे नगरसेवक, जिल्हा परिषद आमच्या ताब्यात आहेत, आमदार आहेत, तेथीलच जागा आम्ही निवडणुकीसाठी मागितल्या आहेत. त्यांना आमचा प्रस्ताव मान्य नसेल आणि फक्त शिंदे गटासोबतच त्यांना जायचे असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा सुचक इशाराही त्यांनी दिला आहे. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.