Ajit Pawar News: शेतकरी आत्महत्यांवरुन अजित पवार संतापले! कोणाच्या सरकारमध्ये किती आत्महत्या; आकडेवारीच सांगितली

शेतकऱ्यांच्या पीकांना दर मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.
Ajit Pawar News
Ajit Pawar Newssaam tv

Maharashtra Assembly Budget Session: राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात सध्या अर्थसंकल्पातील विविध तरतुदींवर चर्चा चालू असतानाच राजकीय मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या पीकांना दर मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.

तसेच यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित करत देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, तसेच एकनाथ शिंदेंच्या काळातील आत्महत्यांचे आकडेच सांगितले.

Ajit Pawar News
Eknath Khadse: अखेर शिक्कामोर्तब! एकनाथ खडसेंच्या खांद्यावर राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी

शेतकरी प्रश्नांवर आक्रमक होताना "जाहिरातीत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो असतो," असे सांगत पंतप्रधान "कृषी सिंचन योजनेमध्ये एकही पैसा खर्च झाला नाही, कोण जबाबदार आहे ह्याला?" असा सवाल अजित पवार यांनी सरकारला विचारला. तसेच देवेंद्र फडणवीसांच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढताना दिसत आहेत असेही ते यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री असताना 2014 ते 2019 पर्यंत 5061 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 2019 ते 2021 या अडीच वर्षात १६०७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या सात महिन्यांमध्ये 1023 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे आकडेच त्यांनी सांगितले.

Ajit Pawar News
ED Raids : दिल्लीपासून बिहारपर्यंत...लालू यादवांशी संबंधित १५ ठिकाणांवर ED चे छापे, तेजस्वीसह नातेवाइकही रडारवर

तसेच याबद्दल पुढे बोलताना त्यांनी "कोणाच्या काळात किती आत्महत्या याबद्दल तुलना करायची नाही, कुठल्याही मुख्यमंत्र्यांना वाटत नसेल की आपल्या काळात शेतकऱ्याने आत्महत्या करावी, मात्र शेतकऱ्यांना परावर्त करण्यासाठी ही आकडेवारी अगदी बोलकी आहे," असेही अजित पवार म्हणाले. (Maharashtra Politics)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com