
(प्राची कुलकर्णी)
इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचा भाजपला धक्का
- श्रीमंत ढोले यांच्यासह पंचायत समिती सदस्य करणार राष्ट्रवादीत प्रवेश
- ढोले -हर्षवर्धन पाटिल यांचे कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद सदस्य
मुंबई -
(विनोद जिरे)
बीड नगर पालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे निलंबित..
उत्कर्ष गुट्टेसह 6 जणांचे झालं निलंबन..
गुट्टेसह, नप प्रशासन अधिकारी नीता अंधारे, पाणीपुरवठा अभियंता राहुल टाकळे, बांधकाम अभियंता योगेश हाडे,
कर अधीक्षक सुधीर जाधव, सहाय्यक रचनाकार सलीम ट्रेसर यांचं झालंय निलंबन..
आमदार विनायक मेटेंच्या लक्षवेधी नंतर झाली कारवाई
आमदार विनायक मेटेंनी दिली माहिती..
(सूरज सावंत)
मुंबई- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका..
मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाई विरोधात याचिका...
मुंबई महानगरपालिकेने जुहू, येथील आदिश बंगल्याला बजावलेल्या नोटिसा रद्द कराव्यात यावी अशी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची याचिकेत मागणी
या याचिकेवर 22 मार्च 2022 रोजी न्यायमूर्ती एए सईद आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठामार्फत सुनावणी होणार
(अश्विनी जाधव- केदारी)
पुणे - पाषाण टेकडीवर आय टी इंजिनिअर तरुण तरुणीला चोरट्यांनी दोघांना मारहाण करुन ऑनलाईन पद्धतीने 1 लाख 15 हजार रुपये ट्रान्स्फर करून घेतले. चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुण तरुणी पाषाण टेकडीवर रात्री 8 च्या सुमारास गेले होते. त्यावेळी तिघांनी त्यांना धमकावून मारहाण केली. आरोपींनी दोघांना जीवे मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली. पैसे नसल्याचे सांगितल्यावर तरुणांचा मोबाईल ताब्यात घेऊन तरुण तरुणीकडून जवळपास 1 लाख 15 हजार रुपये ट्रान्सफर करून पळ काढला. या आरोपींचा शोध पोलीस घेताहेत
(अश्विनी जाधव केदारी)
पुणे महापालिकेत स्थायी समितीच्या आणि अध्यक्षांच्या पद कायम राहण्याच्या तांत्रिक पेचावर राज्य सरकारचा तोडगा
-सगळे अधिकार प्रशासक म्हणून आयुक्तांनाच मुदत संपल्याने स्थायी समिती विसर्जित
-स्थायी समिती अध्यक्ष उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत
- कायद्यानुसार स्थायी समिती विसर्जित होत नसल्याने आपलं पद कायम ,कामकाज करता येण्याच्या मुद्द्यावर हेमंत रासने ठाम
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.