मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साम टीव्ही

Marathi News Live: मुख्यमंत्री ठाकरेंच्या मेहुण्याची संपत्ती ED कडून जप्त

साम टिव्ही मराठी लेटेस्ट न्यूज अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री ठाकरेंच्या मेहुण्याची संपत्ती ED कडून जप्त

रश्मी ठाकरेंची बंधू श्रीधर पाटणकर यांची 6.45 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. त्यांच्या ११ सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत. ठाण्यातल्या निलांबरी प्रोजेक्टमधील ११ सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत. ईडीकडून पुष्पक ग्रुपची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

एसची कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील सुनावणी 5 तारखेला

* एसटी कर्मचा-यांच्या विलीनीकरणावर अद्याप सरकार दरबारी निर्णय झालेला नाही..

* राज्य सरकारला हवी आणखीन 15 दिवसांची मुदतवाढ...

* राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात माहिती...

मुंबई हायकोर्टाचा नारायण राणेंना दिलासा

* मुंबई हायकोर्टाचा राणेंना दिलासा

* आज सुनावणी दरम्यान याचिका निकाली काढली

* महापालिकेनं पाठवलेल्या नोटीशीवर तूर्तास कोणतीही कारवाई न करण्याचा मुंबई हायकोर्टचा निर्देश

* नारायण राणेंनी बांधकाम नियमित करण्यासाठी केलेल्या अर्जावर सुनवणी घेऊन निकाल द्या

* जर निकाल राणे यांच्या विरोधात गेल्यास त्यावर तीन आठवडे कारवाई न करण्याचे हायकोर्टाचे निर्देश

* निकाल विरोधात गेला पुन्हा दाद मागण्याचा पर्याय राणेंकडे उपलब्ध

* कुरल्यातील गोवा वाला कंपाऊंडमध्ये सध्या ईडी चे अधिकारी संपूर्ण चौकशी करत आहेत. या परिसरातील प्रत्येक दुकानात जाऊन चौकशी करत आहेत. हे दुकान कधी कोणी खरेदी केली किंवा या खरेदी मधील व्यवहार काय आहे ही संपूर्ण चौकशी सुरु आहे.

* मंत्री नवाब मलिक यांना याच गोवा वाला कंपाऊंडमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटक झाली आहे आणि याच अनुषंगाने येथे तपास सुरू आहे.

नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार?

* कुर्ल्यातील एलबीएस रोडवरील नवाब मलिक यांच्या गोवावाला कंपाउंड येथे ईडीची टीम पोहोचली आहे.

* या जमिनीत गैर व्यवहारामुळे नवाब मलिक तुरुंगात आहेत.

* आयकर विभागाकडूनही मुंबई बेंगलूरू आणि चेन्नई अशा २४ ठिकाणांवर सर्च आॅपरेशन राबवले जात आहे.

* एका प्रसिद्ध विकासकासंदर्भात ही कारवाई सुरू आहे.

साम टिव्ही मराठी लेटेस्ट न्यूज अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज

(सूरज सावंत)

मुंबई पोलिसांनी आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव महाराष्ट्राच्या गृह विभागाकडे पाठवला आहे

त्रिपाठी त्याच्याविरुद्ध सुरू असलेल्या तपासावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे मुंबई पोलिसांनी आपल्या प्रस्तावात म्हटले आहे.

त्रिपाठी यांच्यावर या प्रकरणाशी संबंधित अंगडियाला प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे, त्रिपाठी यांनी त्यांची तक्रार मागे घेण्यास सांगितल्याचाही आरोप आहे....सविस्तर वृत्त लवकरच

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com