दिलासादायक! राज्यात 407 कोरोना रुग्ण तर 4 मृत्यू

जाणून घ्या ताज्या घडामोडी Saam TV Digitalच्या Live Updates च्या माध्यमातून
दिलासादायक! राज्यात 407 कोरोना रुग्ण तर 4 मृत्यू
दिलासादायक! राज्यात 407 कोरोना रुग्ण तर 4 मृत्यू Saam TV

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना शेतकऱ्यांनी दाखविले काळे झेंडे...

चिखली तालुक्यातील उंद्री या गावातील शेतकऱ्यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना काळे झेंडे दाखवून गो ब्याक घोषणा देत निषेध व्यक्त केलाय. रब्बी हंगामात वीज वितरण कंपनीने निर्दयीपणे वीज कापून शेतातील पिकांना ऐनवेळी पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले व शेतकऱ्याच्या रोषाला ऊर्जा मंत्र्याना सामोरे जावे लागत आहे. दिवसा वीज मिळत नाही. रात्री वीज काही काळ दिल्या जाते, शेतातील पिकांना पाणी देता येत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत हे खामगाव येथील दौरा आटपून चिखलीकडे जाताना उंद्री या गावानजीक शेतकऱ्यांनी मंत्री यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविले...

राज्यात 407 कोरोना रुग्ण तर 4 मृत्यू

कोरोनाची तिसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. आज राज्यात ४०७ रुग्ण आढळले आहेत, तर ९०६ रुग्ण बरे झाले आहेत. मृत्यू दरही कमी झाला आहे. आज राज्यात ४ मृत्यू झाले आहेत.

मराठा समाजाच्या मागण्या मान्य, छत्रपतींच्या लढ्याला यश

मुंबई: खासदार संभाजी राजे मराठा समाजाच्या आरक्षण आणि विविध प्रमुख मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. सरकारला त्यांनी दोन महिन्यांपुर्वी काही मागण्या केल्या होत्या त्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाहीत, त्यामुळे संभाजी राजे गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आज सकाळी वर्षा बंगल्यावर मराठा समन्वयक चर्चेसाठी गेले होते. त्यानंतर चर्चा करुन आल्यानंतर समन्वयकांनी छत्रपतींशी चर्चा केली. बैठकीनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, अमित देशमुख हे संभाजी राजेंना भेटण्यासाठी आले होते. तेव्हा मला आनंदाने सांगायचे आहे. ज्या मागण्या आम्ही ठेवल्या होत्या त्या मान्य झाल्या असल्याचं संभाजी राजे म्हणाले आहेत.

दिलासादायक! राज्यात 407 कोरोना रुग्ण तर 4 मृत्यू
Breaking: मराठा समाजाच्या मागण्या मान्य, छत्रपतींच्या लढ्याला यश

- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

- एकनाथ शिंदे आणि अमित देशमुख छत्रपती संभाजी राजे याना भेटायला जाणार

- महाविकास आघाडी शिष्टमंडळ संभाजी राजेंना भेटणार

- उपोषण मागे घ्यावे म्हणून आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बैठक घेतली

- त्यानंतर हे शिष्टमंडळ आझाद मैदान वर जाणार

संजय पांडे यांची मुंबई पोलीस आयुक्त पदी वर्णी

- मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंची बदली

- संजय पांडे DG होते

- त्यांच्या नियुक्तीला विरोध झाल्याने रजनीश सेठ डिजी झाले

- त्यामुळे संजय पांडे यांची मुंबई पोलीस आयुक्त पदी वर्णी

- मनू कुमार श्रीवास्तव होणार राज्याचे मुख्य सचिव

NCP चा तिसरा मंत्री अडचणीत; प्राजक्त तनपुरेंची प्रॉपर्टी एडी ने जप्त केली

नागपूरमधील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर नागपूर आणि अहमदनगरमधील जमीनही जप्त करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री यांच्या सोबत झालेल्या बैठकी नंतर मराठा समन्वयक आझाद मैदानात..सरकार सोबत झालेली चर्चा आणि सरकारने दाखवलेली तयारी याबाबत समन्वयक संभाजी राजे यांना देणार माहिती..गृहमंत्री पाच वाजता आझाद मैदानावरती जाणार आहेत.

मुंबई: कांजूर मार्ग येथील अपार्टमेंटला आग !

कांजूरमार्ग येथील एन जी रॉयलपार्क मधील इमारत क्रमांक 2 बी ला आग लागली आहे. या इमारती च्या अकराव्या मजल्यावर प्रथम आग लागली. त्यानंतर ही आग पसरत दहाव्या आणि सातव्या मजल्यावर पोहचली.

नवाब मलिक यांच्या मुलाला ईडीच समन्स

(सुरज सावंत)

फराझ मलिक यांना ईडीचे समन्स

फराझ मलिक आजच ईडी कार्यालयात येण्याची शक्यता..

नवाब मलिक प्रकरणात ईडीने फराझ यांना समन्स केलं

आयटीच्या कारवाईनंतर यशवंत जाधवा यांचा माध्यमांशी बोलण्यास नकार

(सुरज सावंत)

- स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी ७२ तास आयटीची कारवाई करण्यात आली

- या कारवाईत यशवंत जाधव यांच्या अनेक कागदपत्रांवर जबरदस्ती स्वाक्षरी घेतल्याची सूत्रांची माहिती

- यामिनी जाधव या एका आजाराने ग्रस्त असून कारवाई दरम्यान यांची प्रकृती खालावली.

- महापालिकेचा अर्थ संकल्प सभागृहात ठेवायचा असून जाधव हे आज पासून पालिकेत सक्रिय.

शिवरायांविषयीचे वक्तव्य राज्यपालांनी मागे घ्यावे, उदयनराजेंची मागणी

(सुशांत सावंत)

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल असं वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावरुन आता महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. यावर आता भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे, असं उदयनराजे त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

ओबीसी आरक्षणावरील सुनावणी ढकली पुढे; 2 मार्चला होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या ओबीसी आरक्षणाविषयी सुनावणी परत एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने ही सुनावणी बुधवारी ठेवली आहे. निवडणुकीशी संबंधिमध्ये २ प्रकरणांवर एकाच वेळी सुनावणी करणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. यामुळे आता बुधवारी २ मार्च दिवशी ओबीसी आरक्षणावर सुनावणी होणार आहे.

संभाजीराजेंना सरकारकडून चर्चेसाठी निरोप

मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीराजे यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून खासदार संभाजीराजे छत्रपती यांना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले आहे.

आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस; संभाजी राजेंचा बीपी आणि शुगर लो

(सुशांत सावंत)

मुंबई - संभाजी राजे यांच्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी संभाजी राजे यांचा बीपी आणि शुगर लो झाला आहे. मात्र तरी देखील आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर उपोषणातून माघार घेणार नाही असा निर्धार संभाजी राजे यांनी केला आहे. दरम्यान जे.जे च्या डॉक्टरची टीम सलाईन लावण्यासाठी आली असता संभाजी राजे यांनी सलाईन लावण्यास नकार दिला

पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख ठरली

(अश्विनी जाधव केदारी)

- 4 मार्चला पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक.

- 14 मार्चला महापालिकेची मुदत संपत असल्याने नवीन अध्यक्षांना केवळ दहा दिवस काम करण्याची संधी मिळणार आहे.

- स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत 1 मार्च रोजी संपणार असल्याने नुकतीच नवीन आठ सदस्यांची निवड करण्यात आली.

- निवडणुकीचे वर्ष असल्याने कमी दिवस अध्यक्षपदाच्या कामकाजासाठी मिळणार आहेत.

जाणून घ्या ताज्या घडामोडी Saam TV Digitalच्या Live Updates च्या माध्यमातून

थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करणार,कोणतीही मुर्वत दाखवणार नाही- नितीन राऊत

(रश्मी पुराणिक)

ग्राहक वीज देयकाची रक्कम भरणार नाहीत अश्या वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल आणि हे करताना कोणतीही मुर्वत दाखवली जाणार नाही ,असा स्पष्ट इशारा राज्याचे ऊर्जा मंत्री नामदार डॉ. नितीन राऊत यांनी रविवारी अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे आयोजित कार्यक्रमात दिला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com