Marathi News Today: पुण्यात CBI ची कारवाई सुरु

जाणून घ्या ताज्या घडामोडी Saam TV Digitalच्या Live Updates च्या माध्यमातून
News Update Live
News Update Live- Saam TV

पुण्यात CBI ची कारवाई सुरु                                                                                                 पुणे - मुंबईसह पुण्यात ED पाठोपाठ आता CBI च्या टिमचीही छापेमारी सुरू आहे.  येस बँक आणि DHFL च्या 20 हज़ार कोटीहून अधिकच्या घोटाळ्या प्रकरणी ही कारवाई सुरू आहे.  हे संपूर्ण प्रकरण एका विकासकाशी संबधित असल्याची प्राथमिक माहिती CBI सूत्रांकडून मिळते आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)

  राणेंच्या घराबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड                                      कणकवली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सिंधुदुर्गातील काँगेस आक्रमक झाली आहे.   केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांची पोलीसांनी धरपकड सुरु केली आहे.  कॉंग्रेसने महाराष्ट्रातून देशभरात कोरोना पसरवला या मोदींच्या लोकसभेतील वक्तव्याचा निषेध करण्यासाठी नारायण राणेंच्या बांगल्यावर आंदोलन करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते निघाले होते.

ईडीची कारवाई- एक संशयित ताब्यात                                              मुंबई-कुख्यात डाॅन दाऊद इब्राहिम यांच्या मालमत्ते संदर्भात सुरू असलेल्या कारवाई दरम्यान एका संशयिताला ईडीने ताब्यात घेतले आहे.  ईडीचे अधिकारी त्या संशयिताला ईडी कार्यालयात घेऊन आले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी त्याच्याकडे चौकशी करण्याची शक्यता आहे.

कणकवलीत राजकीय वातावरण तापले..                                                   कणकवली- आज काँग्रेसने नारायण राणे यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. त्यापूर्वीच कणकवलीत राजकीय वातावरण तापले आहे. राणे समर्थक निवासस्थानाबाहेर जमा झाले असून त्यांनी काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली आहे.

ED कारवाईबाबत काय म्हणाले संजय राऊत...                                         मुंबई - संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांवर हल्लाबोल केला. दक्षिण मुंबईत आज सकाळपासून ईडी (ED) आणि एनआयएकडून (NIA) छापे टाकण्यात येत आहेत. त्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या खास शैलित तपास यंत्रणांवर टीका केली आहे (सविस्तर वृत्त साम टिव्ही वेबसाईटवर मुंबई-पुणे सेक्शनमध्ये वाचा)

दहा ठिकाणी सुरु आहेत EDचे छापे                                                          मुंबई - मुंबईत आज ईडीचं १० ठिकाणी छापासत्र सुरू आहे. अंडरवल्ड डाॅन दाऊद इब्राहिम याची बहिन हसीना पारकरच्या घरी ही कारवाई सुरू आहे. दाऊदच्या मालमत्ता खरेदी विक्री व्यवहारात मनीलाँड्रींग झाल्याचा संशय ईडीला आहे. या व्यवहारात महाराष्ट्रातील एका नेत्याचा हात असल्याचा संशय असल्याचा ईडीला संशय आहे.

ईडीचे पथक हसिना पारकरच्या घरी पोहोचले                                             मुंबई - मुंबईत सकाळपासून ईडीने छापेमारी सुरु केली आहे. दावूद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित व्यवहारांबाबत ही छापेमारी सुरु आहे. काही वेळापूर्वी ईडीचे पथक दावूदची बहिण हसिना पारकरच्या घरीही पोहोचले आहे

मुंबईत ईडीचे छापे-                                                                            मुंबई: मुंबईत ईडीने दावूद इब्राहिमच्या मालमत्तेशी संबंधित व्यवहारांबाबत विविध ठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. ईडी बरोबरच एनआयची टीमही या छाप्यांमध्ये सहभागी आहे. काही राजकीय नेत्यांवरही ईडीची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे...(सविस्तर वृत्त लवकरच)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com