Maharashtra Budget 2023 : शिक्षक सेवकांना भरघोस मानधन, सरासरी 10 हजारांची वाढ; विद्यार्थ्यांनाही भरभरून दिलं

Maharashtra Budget 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने सत्तेत आल्यानंतर आज पहिला अंर्थसंकल्प सादर केला.
Maharashtra Budget 2023
Maharashtra Budget 2023Saam tv

Maharashtra Budget 2023 : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने सत्तेत आल्यानंतर आज पहिला अंर्थसंकल्प सादर केला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसकल्प सादर केला. यावेळी सरकारे शैक्षणिक क्षेत्रासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

यात शिक्षक सेवकांना भरगोस पगारवाढीपासून ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश देण्याच्या घोषणांचा समावेश आहे. यासोबतच राज्यात १४ ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांचे बांधकामकाम सुरू करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Maharashtra Budget 2023
Maharashtra Budget 2023 LIVE Updates : वास्तवाचं भान नसलेला अर्थसंकल्प; अजित पवार यांची टीका

शिक्षकसेवकांचे मानधन वाढवले

पगारवाढीच्या प्रतिक्षेत असेलेल्या राज्यातील शिक्षक सेवकांना राज्य सरकारने अर्थसंकल्पात मोठा दिलासा दिला आहे. अर्थमंत्र्यांनी शिक्षक सेवकांसाठी सरासरी १० हजार रुपयांची भरघोस मानधन वाढ करण्याची घोषणा केली आहे. प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षक सेवकांचे मानधन ६००० रुपयांवरून १६००० रुपये होणार आहे. माध्यमिक शिक्षण सेवकांचे मानधन ८००० रुपयांवरून १८००० रुपये करण्यात येणार आहे, तर उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांचे मानधन ९००० रुपयांवरून वाढवून २०००० रुपये करण्यात येणार आहे.

पीएमश्री योजनेसाठी भरीव तरतूद

याशिवाय राज्यात केंद्र सरकारची पीएमश्री शाळा योजना राबवली जाणार आहे. या योजनेंतर्गत राज्यात ५ वर्षांत ८१६ शाळा सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी १५३४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Budget 2023
Maharashtra Budget: 'कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणार...' फडणवीसांचे आश्वासन; शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात 'या' मोठ्या घोषणा

विद्यार्थ्यांना मिळणार मोठी शिष्यवृत्ती

विद्यार्थ्यांसाठी देखील अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी घेतली आहे. याशिवाय ८वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेशही मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार 5वी ते 7वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती 1000 वरुन 5000 रुपये करण्यात आली आहे, तर 8वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती 1500 वरुन 7500 रुपये करण्यात आली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

१४ ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये

विद्यापीठांसाठी १ हजार ९२० कोटींची तरतूद. राज्यात १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचं बांधकाम होणार. यात सातारा. अलिबाग. सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर आणि ठाण्यातील अंबरनाथ या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांचं काम यावर्षी सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com