अखेर! महाराष्ट्रात धावणार हायस्पीड बुलेट ट्रेन बुलढाण्यात झाले प्रेझेंन्टेशन

प्रशासन व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामुळे आज राज्यातील जनतेला या हायस्पीड बुलेटट्रेन बद्दल माहिती मिळाली आहे.
अखेर! महाराष्ट्रात धावणार हायस्पीड बुलेट ट्रेन बुलढाण्यात झाले प्रेझेंन्टेशन
अखेर! महाराष्ट्रात धावणार हायस्पीड बुलेट ट्रेन बुलढान्यात झाले प्रेझेंन्टेशनसंजय जाधव

बुलढाणा: नागपूर मुंबई समृद्धी (Nagpur Samruddhi Mahamarg) महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात येतं न येतं तोच सरकारने (State Government) आता या मार्गालगत मुंबई नागपूर हायस्पीड ट्रेनचा प्रोजेक्ट सरकारने हाती घेतला आहे. यासंबंधीचं व या हायस्पीड ट्रेनचं आज बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी (Buldhana Collector) कार्यालयाच्या सभागृहात प्रेझेन्टेशन देण्यात आलं. यावेळी प्रशासन व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामुळे आज राज्यातील जनतेला या हायस्पीड बुलेटट्रेन बद्दल माहिती मिळाली आहे.

बुलेट ट्रेन म्हटलं की आपल्याला फक्त मुंबई-अहमदाबाद या ट्रेन विषयीच मनात आहे. पण आता रेल्वेने महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा सुखद धक्का दिला आहे. हो. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या बाजूने आता महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातून हायस्पीड बुलेट ट्रेन धावणार असून आज राज्यातील पहिली बैठक बुलढान्यात झाली आहे. या हायस्पीड ट्रेनचं रेल्वेचे समाज विकास अधिकारी श्याम चौघुले यांनी जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांसमोर प्रेझेन्टेशन दिलं आहे. या हायस्पीड ट्रेनचा D.P.R बनविण्याच काम देखील सुरू झालं असून आता या 10 जिल्ह्यात स्थानिक प्रशासन व रेल्वे कमिटी याबद्दल काम सुरू करणार आहेत.

अखेर! महाराष्ट्रात धावणार हायस्पीड बुलेट ट्रेन बुलढान्यात झाले प्रेझेंन्टेशन
स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांवरील कर्जाची फडणवीसांकडून कर्जमुक्तता

बुलेट ट्रेनविषयी महत्वाचे

- जिल्ह्याधिकारी कार्यलयात बैठक सुरु.

- 10 जिल्ह्यातून रेल्वे मार्ग जाणार

- नागपुर मुंबई फक्त साडेतीन तासात होणार प्रवास.

- जास्तीत जास्त 350 किमी प्रति तास वेग या ट्रेनचा असेल.

- या ट्रेन मध्ये एकावेळी जास्तीत जास्त 750 प्रवास करू शकतील.

- बुलढाणा जिल्ह्यातील 1245 हेक्टर जमीन मार्गासाठी लागणार.

- बुलढाणा जिल्ह्यात मेहकर रेल्वे स्टेशन राहील .

- जंगल परिसरात बोगदे तैयार करण्यात येईल.

- नागपुर ते ठाणे 370 गावे प्रभावित होणार आहे.

- बुलढाणा जिल्ह्यातिल 47 गावे येणार आहे.

- बुलढाणा जिल्ह्यातून 87 किमी जाणार आहे.

- जिल्ह्यातिल मेहेकर लोणार सिंदखेडराजा देउळगावराजा अश्या तालुक्यातुन जाणार.

- जमिनिची थेट खरेदी पद्धत राहिल.

- शहरात अडीच टक्के ग्रामीण भागातील जमिनिची रक्कम पाचपट देण्यात येणार आहे.

आज बुलढाणा जिल्ह्यात या हायस्पीड लोहमार्गाचं प्रकल्पाचं सादरीकरण झालं आहे. लवकरच या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR तयार करण्याचं काम सुरू होणार असून हा अहवाल तयार झाल्यावर तो जागतिक बँकेकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर जागतिक बँकेने मंजूर केल्यावरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.

अखेर! महाराष्ट्रात धावणार हायस्पीड बुलेट ट्रेन बुलढान्यात झाले प्रेझेंन्टेशन
पाच पैशाची बिर्याणी पडली महागात! मालकाच्या अंगलट आली आयडिया

कधीकाळी स्वप्नवत वाटणारी हायस्पीड बुलेट ट्रेन आता राज्यातील दहा जिल्ह्यातून धावणार असल्याचा विचारच आपल्याला स्वप्नात घेऊन जातो. आज बुलढान्यात प्रेझेन्टेशन दिल्या गेलं आहे! आता तर प्रत्यक्षात हायस्पीड ट्रेन मुंबई ते नागपूर अशी धावणार असून याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचं कामही सुरू झालं आहे. यामुळे मात्र विदर्भातील शहर मुंबईच्या अगदी जवळ येत असून नागपूर मुंबई प्रवास फक्त साडेतीन तासात होणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com