महाराष्ट्र बंद: नागनाथ मंदिर परिसरातील दुकाने आज पुन्हा बंद...

औंढा नागनाथ मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांची दोन वर्षानंतर सुरू झालेली दुकाने आज पुन्हा बंद झाली आहेत, त्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसला आहे.
महाराष्ट्र बंद: नागनाथ मंदिर परिसरातील दुकाने आज पुन्हा बंद...
महाराष्ट्र बंद: नागनाथ मंदिर परिसरातील दुकाने आज पुन्हा बंद...संदीप नागरे

हिंगोली: औंढा नागनाथ मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांची दोन वर्षानंतर सुरू झालेली दुकाने आज पुन्हा बंद झाली आहेत, त्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसला आहे. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या बंदचा मोठा फटका येथील दुकानदारांना आणि व्यापाऱ्यांना बसला आहे. तीन दिवसांपूर्वी राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यात आली होती. (Maharashtra closed: Shops in Nagnath temple area closed again today)

हे देखील पहा -

हिंगोली जिल्ह्यातील आठवे ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असलेल्या औंढानागनाथ मध्ये, व्यापाऱ्यांनी सात तारखेला मंदिराच्या परिसरात असलेली २०० पेक्षा जास्त दुकाने उघडी करून आपला व्यवसाय सुरु केला होता, मात्र महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदच्या निर्णयामुळे या व्यापाऱ्यांना आपली प्रतिष्ठाने बंद करून हातावर हात ठेऊन बसावे लागले आहे. यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.