आषाढी एकादशीला मी पंढरपूरला येईन; मुख्यमंत्र्यांचे अभिवचन

आषाढी एकादशीला मी पंढरपूरला येईन; मुख्यमंत्र्यांचे अभिवचन
uddhav thackreay

पंढरपूर : येत्या २० जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होणार आहे. दोन वर्षापासुन राज्यात कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचा आणखी प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य सरकारने आषाढी पायी पालखी सोहळा व पंढरपूरची यात्रा रद्द केली आहे. दरम्यान आषाढीचा सोहळा मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत प्रतिकात्मक पध्दतीने साजरा केला जाणार आहे. प्रथेनूसार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे uddhav thackreay यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रूक्मिणीची महापूजा करण्यासाठी मंदिर समितीने गुरुवारी मुख्यमंत्री ठाकरे यांची मुंबईत भेट घेवून त्यांना पूजेचे निमंत्रण दिले आहे. (maharashtra-cm-invited-pandharpur-vitthal-rukmini-pooja-ashadi-ekadashi)

मानाच्या दहा पालख्यातील ४०० भाविकांना वारीसाठी पंढरपुरात प्रवेश दिला जाणार आहे. सर्व प्रथा आणि परंपराचे जतन करत यंदाचा आषाढी एकादशीचा सोहळा साजरा केला जाणार आहे.

या महापूजेसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे १९ जुलैला रोजी पंढरपुरात मुक्कामी येणार असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झालेली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांना महापूजेला भाजपसह विविध वारकरी संघटनांनी विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच पंढरपुरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

uddhav thackreay
Kolhapur Live : आराेग्यमंत्री येताच अधिका-यांची झाली धावाधाव

आषाढी एकादशीच्या साेहळ्याची मंदिर समितीने तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंदीर समितीच्या या निमंत्रणाचा नम्रपणे स्विकार करत महापूजेसाठी पंढरपूरला येण्याचे अभिवचन दिले आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

याबराेबरच मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते मंदिरात संत कान्होपात्रा समाधी जवळ तरटीचे नवीन रोपाची लागवड केली जाणार असल्याचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी नमूद केले. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, सदस्य संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर महाराज जळगाकर आदी उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com