'भारत जोडो यात्रे'वर बंदी आणण्याच्या शेवाळेंच्या मागणीवर काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर; नाना पटोले म्हणाले...

खासदार शेवाळे यांच्या मागणीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिलं आहे
rahul shewale and nana patole
rahul shewale and nana patole saam tv

Nana patole News : राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली 'भारत जोडो यात्रा' महाराष्ट्रात पोहोचली आहे. या यात्रेत हजारो काँग्रेस समर्थक सहभाग नोंदवत आहेत. याचदरम्यान, राहुल गांधी हे वीर सावरकरांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करत असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वात सुरू असलेली काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' बंद करावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. खासदार शेवाळे यांच्या मागणीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

rahul shewale and nana patole
Devendra Fadnavis : 'राहुल गांधींना सावरकरांचा स देखील माहीत नाही'; फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल

स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात हिंदुत्व या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत खासदार शेवाळे यांनी यात्रेवर बंदी आणावी अशी मागणी केली. त्यानंतर शेवाळे यांनी बाळासाहेबांनी जशी जोडेमारे यात्रा केली होती, तसे जोडेमारो आंदोलन येत्या काळात करणार आहोत, अशी घोषणाही केली.

शेवाळेच्या 'भारत जोडो यात्रा' थांबवावी, या मागणीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रत्युत्तर देताना म्हणाले, ज्यांना भारत जोडो यात्रेबद्दल कळत नसेल, लोकांना जोडणं कळत नसेल. देशाच्या संविधानिक व्यवस्थेबद्दल कळत नसेल. त्यांची कीव आम्हाला येते'.

rahul shewale and nana patole
Nawab Malik : नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ; अ‍ॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

नाना पटोले पुढे म्हणाले, 'भारत जोडो यात्रा आता जनतेची झाली आहे .यात्रा जेव्हा जनतेची होते, तेव्हा जनताच त्यांना सत्तेवरून उतरवणार. आज आम्हाला कुठल्याही लोकांना आणायला लागत नाही. लोकांचा राग हा केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आहे. तो या ठिकाणी जाणवत आहे. त्यामुळे कुठलाही कारण पुढे आणून हिरोगिरी करण्याचा प्रयत्न करत असेल, तर जनता मान्य करणार नाही'.

'राहुल गांधीच नव्हे तर देशातील जनता रस्त्यावर उतरली आहे. जनतेचा विरोध केंद्र आणि राज्य सरकार करत असेल तर जनताच त्यांना धडा शिकवेल, असा टोला देखील पटोले यांनी शिंदे सरकारला लगावला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com