
मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाचा (corona) कहर सुरूच आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने आज, शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३०८१ नवीन कोरोना रुग्णांची (corona new patients) नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा वाढला आहे. राज्यात ३,०८१ रुग्णांची नोंद झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची (corona active patients) संख्या आता १३३२९ वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
१३२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ७७,४३,५१३ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे राज्यातील प्रमाण हे ९७.९६ टक्के इतके झाले आहे. तर मृत्यूदर १.८७ टक्के इतका आहे. आजपर्यंत ८,१२३७५४४ नमुने प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले होते. त्यापैकी ७९,०४,७०९ नमुने कोविड १९ पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबई विभाग - मुंबई विभागात मुंबई महापालिका (BMC), ठाणे, ठाणे महापालिका, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, भिवंडी-निजामपूर महापालिका, मीरा भाईंदर महापालिका, पालघर, वसई विरार महापालिका, रायगड, पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण २७३१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
नाशिक विभाग- नाशिक, नाशिक महापालिका, मालेगाव महापालिका, अहमदनगर, अहमदनगर महापालिका, धुळे, धुळे महापालिका, जळगाव, जळगाव महापालिका, नंदुरबार आदी क्षेत्रांत २८ नवे रुग्ण आढळले आहेत.
पुणे विभाग - पुणे, पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, सोलापूर, सोलापूर महापालिका, सातारा परिसरात २२३ रुग्ण सापडले आहेत.
कोल्हापूर विभाग - कोल्हापूर, कोल्हापूर महापालिका, सांगली, सांगली महापालिका, सिंधुदुर्ग, रत्नागिरी क्षेत्रात एकूण २४ नवे रुग्ण आढळले आहेत.
औरंगाबाद विभाग - औरंगाबाद, औरंगाबाद महापालिका, जालना, हिंगोली, परभणी, परभणी महापालिका क्षेत्रात ३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
लातूर विभाग - लातूर, लातूर महापालिका, उस्मानाबाद, बीड, नांदेड, नांदेड महापालिका आदी भागांत १३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
अकोला विभाग - अकोला, अकोला महापालिका, अमरावती, अमरावती महापालिका, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम आदी क्षेत्रात ६ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत.
नागपूर विभाग - नागपूर, नागपूर महापालिका, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, चंद्रपूर महापालिका आणि गडचिरोली या भागांत गेल्या २४ तासांत ५३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
Edited By - Nandkumar Joshi
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.