दिलासादायक! राज्यात नव्या कोरोना रुग्णांमध्ये घट; अशी आहे आजची स्थिती

राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले होते. मात्र, आज राज्यात कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
Maharashtra corona update
Maharashtra corona update saam tv

रश्मी पुराणिक

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले होते. मात्र, आज राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात (Maharashtra) कोरोनाचे २ हजार ५७५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे यादरम्यान,३ हजार २१० जणांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, राज्यात सध्या १६ हजार ९२२ रुग्ण उपचाराधीन आहेत. (Maharashtra Corona Virus latest Update )

Maharashtra corona update
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अडचणीत वाढ; पुणे न्यायालयाकडून चौकशीचे आदेश, जाणून घ्या काय आहे कारण ?

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, बुधवारी राज्यात २,५७५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात १० कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८४ टक्के एवढा आहे. आज राज्यात ३२१० रुग्ण बरे झाले. त्यामुळे राज्यात आतापर्यंत ७८,४५, ३०० कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आता एकूण १६, ९२२ कोरोना रुग्ण सक्रिय आहेत.

Maharashtra corona update
Pune Rain : पुण्यासाठी पुढचे ४८ तास महत्वाचे; घराबाहेर न पडण्याचा सल्ला, शाळा-कॉलेजला सुट्टी

अमरावती जिल्ह्यात कॉलराचा उद्रेक; पाच जणांचा मृत्यू

दरम्यान, अमरावती आणि चिखलदरा येथे ७ जुलै २०२२ पासून कॉलराची साथ (cholera outbreak) सुरु झाली आहे. चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरी, कोयलारी आणि घाना या तीन गावांमध्ये तर अमरावती तालुक्यातील नया अकोला या गावांमध्ये सध्या कॉलराचा उद्रेक झाल्याचे चित्र आहे. आतापर्यंत कॉलराचे १८१ रुग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर दुसरीकडे पालघर जिल्ह्यातही राज्यातील झिका व्हायरसचा (Zika virus) दुसरा रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com