Corona Updates : राज्यात रुग्णांची वाढ सुरूच! आज आढळले ९ हजार १७० नवीन रुग्ण!

राज्यात एकाच दिवसात ९ हजार १७० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. काल ८ हजार ६७ रुग्ण होते. केवळ २४ तासात रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे.
Corona Update
Corona Updatesaam tv

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाने विस्फोटक रुप धारण केले आहे. राज्यात एकाच दिवसात ९ हजार १७० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या राज्यात चिंतेचे वातावरण बनत आहे. आज राज्यात कोरोनाने रुग्णांचा बळी घेतला आहे.

Mumbai Corona Update :

राज्यात कोरोनाचा वेगाने फैलाव होत असताना मुंबईत देखील झपाट्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात सगळ्यात जास्त रुग्ण मुंबईमध्ये आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंता वाढल्या आहेत. आज मुंबईत कोरोनाचे ६,३४७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झालाय. काल मुंबईत ५,६३१ रुग्ण आढळले होते. तसेच एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. परवा ३,६७१ रुग्ण मुंबईत सापडले होते. तर ० मृत्यूची नोंद झाली होती.

Pune Corona Update :

मुंबई पाठोपाठ आता पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यात आज तब्बल ६३१ नवे रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे. हि रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर लवकरच राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील सध्याची ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ३ हजार २७४ वर पोहोचली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com