मुंबईसह राज्यात कोरोनाचा धोका कायम; सक्रिय रुग्णांची संख्या वाढतेय

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा धोका कायम आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने आज, मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, राज्यात गेल्या २४ तासांत २९५६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
मुंबईसह राज्यात कोरोनाचा धोका कायम; सक्रिय रुग्णांची संख्या वाढतेय
Corona news Saam Tv

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना (Corona) विषाणूचा धोका कायम आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने आज, मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, राज्यात गेल्या २४ तासांत २९५६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येचा आकडा १८,२६७ वर पोहोचला आहे. तसेच कोविड १९ मुळे ४ रुग्णांचा मृत्यू (Death) झाला आहे. ( Maharashtra Corona Update In Marathi )

Corona news
नागरिकांनो काळजी घ्या! मुंबईत पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढले

मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांसहित आरोग्य मंत्र्यांनी देखील नागरिकांनी मास्क लावणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत राज्यात २९५६ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या १८,२६७ वर पोहोचली आहे. तसेच कोविड १९ मुळे ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १,४७,८७५ झाली आहे. राज्यात आतापर्यंत २१६५ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे एकूण कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या ७७,४९,२७६ इतकी झाली आहे. कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर ९७.६० टक्के एवढा आहे. तर राज्यात कोरोना मृत्यूदर १.८६ टक्के इतका आहे.

Corona news
सर्व तालुक्यात संविधान सभागृह उभारण्यासाठी सुधारित आराखडा सादर करा- धनंजय मुंडे

मुंबईतही रुग्णांची वाढती संख्या

मुंबईत आज सोमवारी दिवसभरात १७२४ रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे मुंबईतील आजपर्यंतची कोरोना रुग्णांची एकूण संख्या १०८३५८९ वर पोहोचली आहे. तर १०५२२०१ एवढे रुग्ण आजपर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. तर मुंबईत कोरोनाचे एकूण ११८१३ सक्रिय रुग्ण आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com