
Akola News Update : राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचं वातावरण तापलं असताना विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जोरदार रणनीती आखली आहे.
दुसरीकडे, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचं भाकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वर्तवलं आहे. येत्या १४ फेब्रुवारीला हे सरकार कोसळेल, असे ते म्हणाले.
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार धीरज लिंगाडे यांच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलं. त्याचवेळी हे सरकार १४ फेब्रुवारीला कोसळणार आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, असे ते म्हणाले. (Eknath Shinde)
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आज ट्विट करून राजकीय वर्तुळात धुरळा उडवून दिला. हे सरकार शिवजंयतीपूर्वी कोसळणार असल्याचं मिटकरींनी ट्विटमध्ये नमूद केलं. तसेच निवडणूक घेतल्या तर, महाविकास आघाडी एकत्र लढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्याबाबत बोलताना नितीन देशमुख म्हणाले, की 'सर्वोच्च न्यायालय निकाल देईल. १६ आमदार अपात्र ठरतील आणि हे सरकार कोसळेल.' शिवसेनेला निवडणुका हव्या आहेत, असंही देशमुख म्हणाले.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असे भाकीत अमोल मिटकरींनी वर्तवलं होतं, त्याला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलं आहे. मुंगेरीलाल के हसीन सपनें असे म्हणावे लागेल, असे दरेकर म्हणाले. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही हल्ला चढवला. संजय राऊत यांनीही तारखा दिल्या. त्याला सात महिने उलटून गेले तरी सरकार कोसळले नाही. सरकार पडेल असे सांगून ते आपले नेते जाऊ पाहताहेत, त्यांना थांबवण्याचा हा प्रयत्न आहे, असा टोला त्यांनी लगावला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.