Maharashtra Government Yojana: 1 रुपयात पीकविमा, वर्षाला मिळणार 6 हजार रुपये! राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 2 मोठ्या योजना

Maharashtra Government Nirnay : मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनांना मंजूरी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेटमध्ये या दोन घोषणा केल्या होत्या.
Maharashtra Government Announcements
Maharashtra Government Announcements saam tv

Maharashtra Government Announcements : शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. राज्य सरकारने (Shinde-Fadnavis government) शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना (Namo Shetkari Samman Nidhi Yojana) आणि 1 रुपयात पीकविमा (Crop insurance in 1 rupee) अशा दोन योजनांची घोषणा केली आहे.

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनांना मंजूरी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेटमध्ये या दोन घोषणा केल्या होत्या. या दोन्ही योजानंना आता मंजुरी मिळाली आहे.

Maharashtra Government Announcements
Maharashtra Politics: भाजप-शिंदे युतीत मिठाचा खडा? भाजपच्या 'त्या' रणनितीमुळे शिंदे गटात अस्वस्थता

काय आहे 'नमो शेतकरी सन्मान योजना'?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव असलेल्या ‘नमो शेतकरी सन्मान योजने’च्या (NSSY) प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्याती ही योजना राबवली जाणार आहे. या योजनेनंतर्गत शेतकऱ्यांना किमान वर्षाला 6 हजार रुपायांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता वर्षाला केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे एकूण 12000 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. (Breaking News)

शेतकऱ्यांना १ रुपयात मिळणार पीक विमा

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैटकीत राज्यातील शेतकऱ्यांना १ रुपयांत पिक विमा देण्याच्या प्रस्तावाला देखील मंजुरी मिळाली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता केवळ १ रुपयांत पिक विमा मिळणार आहे. याची उर्वरित रक्कमेचा हप्ता आता राज्य सरकार भरणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प २०२३ मध्ये केली होती. यासाठी अंदाजे ३,३१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचंही त्यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले होते. (Latest Political News)

Maharashtra Government Announcements
Congress MP Balu Dhanorkar Passed Away: बाळू धानोरकर यांच्या निधनाने शोक अनावर; राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

कोणाला होणार फायदा?

राज्यात होणारा अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यामुळे अशा प्रकारच्या योजनेतून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी हा या योजनेमागचा हेतू आहे. या योजनेच्या माध्यमातून पेरणीपासून काढणीपर्यंत नैसर्गिक आपत्ती अथवा किड, रोगामुळे होणारे नुकसान, पूर, दुष्काळ इत्यादीमुळे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास आणि पीक काढणीनंतर नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचे नुकसान झाल्यास पंचनामा करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार येणार आहे. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com