आषाढी एकादशीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्या, परिवहनमंत्र्यांनी दिले 'हे' निर्देश

पंढरपूर यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती.
आषाढी एकादशीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्या, परिवहनमंत्र्यांनी दिले 'हे' निर्देश
Ashadhi ekadashisaam tv

मुंबई :आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) राज्यभरातून असंख्य पालख्या आणि भाविक श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत असतात. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या वारकरी भक्तांची संख्या पाहता त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, त्यासाठी एसटी महामंडळाकडून पंढरपूर येथे आरोग्य शिबिर (Health Camp) आयोजित करावे. तसेच त्यांना पिण्यासाठी नाममात्र दरात स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब (Anil Parab) यांनी दिले आहेत.

Ashadhi ekadashi
जुळ्यांचा नादच खुळा! दहावीच्या परीक्षेत मिळवले एकसारखेच गुण

दरम्यान, यात्रेदरम्यान महामंडळाने वारकऱ्यांसाठी केलेल्या सोयी-सुविधांची रिवहन मंत्री परब यांनी स्वत:पाहणी करणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले. पंढरपूर यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलतानापरब म्हणाले,पंढरपूर यात्रेदरम्यान एसटीच्या प्रवासी वाहतूकीला अनन्यसाधारण महत्व असते.त्यामुळे वारकरी,भाविक तसेच प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यत घेऊन जाणे त्याचबरोबर श्री विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना सुखरूपपणे गावी सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असते.

Ashadhi ekadashi
Corona Update : राज्यात कोरोनाचा धोका कायम; अशी आहे आजची ताजी आकडेवारी

सर्वसामान्य नागरिक हे एसटीचे खरे प्रवासी दैवत आहेत. त्यामुळे पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांची तसेच नागरीकांची काळजी घेणे एसटी महामंडळाचे काम आहे.भरपावसात लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूर येथे पालख्यांसोबत चालत येतात. त्यांच्या सेवेसाठी एसटीनेही हातभार लावत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पंढरपूर येथे आरोग्य शिबिर आयोजित करावे.

पंढरपूर येथे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या चार एसटी स्थानकांवर हे शिबिर आयोजित करावे, यात्रेदरम्यान इंधनाचा आवश्यक साठा करून ठेवा. प्रवासादरम्यान बस बंद पडल्यास तातडीने पर्यायी बसेसची व्यवस्था करावी, तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे,असे निर्देशही परब यांनी बैठकीत दिले.आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी राज्यभरातील असंख्य गावातून लाखोंच्या संख्येने नागरिक पंढरपूरकडे रवाना होत असतात.

मात्र,अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी महामंडळाने ग्रुप आरक्षणाला प्राधान्य द्यावे,नागरिकांनी ग्रुप बुकिंग केले तर त्यांना गावच्या ठिकापासून ते पंढरपूर येथील विठूरायाच्या दर्शनानंतर त्यांना थेट त्यांच्या गावात सोडण्याची व्यवस्था करावी, असेही परिवहनमंत्री ॲड.परब यांनी सांगितले.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com