महिला बचत गटासाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा, 'या' योजनेचा लाभ मिळणार

महिला सक्षमीकरणासाठी 'महिला स्वयं-सिध्दी व्याज परतावा योजना' सुरू करण्‍यात आली आहे.
महिला बचत गटासाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा, 'या' योजनेचा लाभ मिळणार
Vijay WadettiwarSaam Tv

मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण प्रवर्गातील महिला सक्षमीकरणासाठी (Woman Empowerment) 'महिला स्वयं-सिध्दी व्याज परतावा योजना'सुरू करण्‍यात आली आहे. या योजनेंतर्गत महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंची उत्पादने, प्रक्रिया मुल्य आधारीत उद्योगांकरीता बँकांमार्फत मंजूर करण्यात आलेल्या रू ५.०० लक्ष आणि रु.१०.०० लक्षपर्यंतच्या कर्ज रक्कमेवरील १२% व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा महामंडळामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, तरी या घटकातील अधिकाधिक महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री (Vijay Wadettiwar) विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

Vijay Wadettiwar
'आपला अॅटीट्यूड सुधारा', पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा विराट कोहलीला सल्ला

ही योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्र (OMRC) च्या सहाय्याने राबविण्यात येणार आहे. बचत गटात किमान ५० टक्के इतर मागास प्रवर्गातील (OBC) महिला असतील असा बचत गट व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील.प्रथम टप्प्यातील कर्ज नियमित परतफेडीनंतर सदर बचत गट द्वितीय टप्प्यात रु.१०.०० पर्यंत कर्ज बँकेकडून मंजुर करुन घेण्यास पात्र होईल.

बँकेकडुन मंजुर केलेल्या कर्ज रक्कमेवरील कमाल १२% व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा ओबीसी महामंडळामार्फत अदा करण्यात येईल. या योजनेचे स्वरूप,अर्जदाराच्या पात्रतेच्या अटी व शर्ती, अर्जासोबत जोडावयाची कागदे याबाबत सविस्तर माहिती ७ जून २०२२ च्या शासननिर्णयात देण्यात आली आहे.

Vijay Wadettiwar
राहुल गांधींच्या ईडी चौकशीनं काँग्रेस आक्रमक; राजभवनावर मोर्चा धडकण्यापूर्वीच पोलिसांनी अडवला

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ओबीसी प्रवर्गातील लाभार्थीसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता राज्य व देशांतर्गत उच्च शिक्षणाकरीता 'शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना' त्याचप्रमाणे परंपरागत व्यवसायात कार्यरत व इतर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या युवक-युवतींसाठी 'कौशल्य विकास प्रशिक्षण योजना' देखील अंमलात आणली आहे.

राज्यातील इतर मागास प्रवर्गातील अधिकाधिक पात्र महिलांनी 'महिला स्वयं-सिध्दी व्याज परतावा योजनेचा लाभ घेवून स्वावलंबी व आत्मनिर्भर व्हावे, तसेच राज्याच्या आर्थिक विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com