
Maharashtra Legislative Graduate Constituency Election : विधानपरिषदेच्या पदवीधर (Graduate Constituency Election) आणि शिक्षक मतदारसंघाच्या (Teachers Constituency Election) पाच जागांसाठी आज (साेमवार) मतदानाच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. नाशिक (Nashik), अमरावती (Amravati) पदवीधर तसेच औरंगाबाद (Aurangabad), नागपूर (Nagpur) आणि काेकण (Kokan) शिक्षक मतदारसंघासाठी मतदार आपला हक्क बजावत आहेत. येत्या दाेन फेब्रुवारीला मतमाेजणी हाेणार असून यंदाच्या निवडणुकीत काेण जिंकले ते त्यादिवशी स्पष्ट हाेणार आहे.
भाजपचे किरण पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क
औरंगाबाद शहरात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (election) मतदान सुरू आहे. औरंगाबाद शहरातील तहसील कार्यालयाच्या मतदान केंद्रावर भाजपचे उमेदवार किरण पाटील (Kiran Patil) यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी बाेलताना विजयाचा विश्वास व्यक्त केला.
'मविआ' च्या शुभांगी पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील (shubhangi patil) यांनी आपला मतदानाचा हक्क धुळ्यातील महानगरपालिका शाळा क्रमांक आठ येथे बजावला. तत्तपुर्वी पाटील यांनी धुळ्यातील खानदेश कुलस्वामिनी एकवीरा देवी मातेच्या दर्शन घेत विजयाची माळ माझ्याच गळ्यात पडणार असल्याचे माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, खासदार हिना गावित यांनी नंदुरबार येथे मतदान केले.
भाजपचे डॉ. रणजित पाटील यांना विजयाची खात्री
अमरावती पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील (Dr. Ranjit Patil) यांनी आज आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी डॉ. अपर्णा पाटील या होत्या. अकोल्यातील आरडीजी महाविद्यालयात पाटील यांनी सपत्नीक मतदान केले. दरम्यान या निवडणुकीत आपलाच विजय होईल असा दावा ही त्यांनी केला.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.