कोरोनानं टेन्शन वाढवलं; मास्कसक्तीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं सूचक विधान

मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघर या मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत असल्याने त्या ठिकाणची वाढती रुग्ण संख्या चिंता करायला लावणारी.
कोरोनानं टेन्शन वाढवलं; मास्कसक्तीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं सूचक विधान
Rajesh Topeलक्ष्मण सोळुंके

लक्ष्मण सोळुंके

जालना: कोरोनाची वाढती रुग्ण संख्या ही काळजी वाढवणारी असून काल मुंबईतून (Mumbai) समोर आलेली कोरोनाची आकडेवारी, यामुळे काही भागाची काळजी नक्कीच घ्यावी लागेल अशी चिंता आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी व्यक्त केली आहे. तसेच राज्यात आता कोरोना (Corona) टेस्ट वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे अशीही माहिती त्यांनी दिली. ते आज जालन्यात बोलत होते.

राजेश टोपे म्हणाले, मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघर या मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत असल्याने त्या ठिकाणची वाढती रुग्ण संख्या चिंता करायला लावणारी आहे. त्यासाठी ज्या भागात रुग्ण संख्याचा आकडा वाढत आहे त्या ठिकाणी टेस्टिंग संख्या वाढवण्याची गरज आहे, म्हणून टेस्टिंग वाढवण्याबाद निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Rajesh Tope
आता Adani Group बनवणार ड्रोन! 'या' स्टार्टअपसोबत मोठा करार

त्यांनी सांगितलं की, वाढती रुग्ण संख्या पाहता मास्क सक्ती जरी नसली तरी मास्क (Mask) बाबद ही नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, लोकांनी अलर्ट राहावं. नाहीतर मास्क सक्ती बाबद विचार करावा लागेल असा इशारा ही या वेळी दिला आहे. त्यांनीठिकाणी रुग्ण संख्या वाढत आहे त्या त्या ठिकाणी टेस्टिंग वाढवण्यासाठी आरोग्य विभागाला सूचना केल्या गेल्या आहेत.

त्यांनी सांगितले, सध्या ओमिक्रोनबद्दल (Omicron Variant) तपासणी करणे सुरु आहे. WHO ने दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे ओमिक्रोनबाबद ही आपण मोठ्या प्रमाणात तपासणी करत आहोत, त्यात ओमिक्रोनच्या विषाणूत मोठ्या प्रमाणात अजूनही बदल झाले आहेत का? हे आम्ही पाहत आहोत. BA4 आणि BA5 हे दोन्ही विषाणू बदल होण्याची शक्यता चिंता वाढवणारे असल्याचे WHO ने सांगितले आहे. त्यामुळे त्याची काळजी आपण घेत आहोत.

हे देखील पाहा-

यांनतर ते म्हणाले, चायना, बीजिंग, शांघाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्बंध लावण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने आपल्यासारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशात ही काळजी घेतली पाहिजे. आपण जास्त सतर्क राहिले पाहिजे. त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत आणि आरोग्य विभाग त्या पद्धतीने काम करत असल्याचे ही टोपे यांनी म्हंटल आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com