महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरूच

सध्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊसाने चांगलंच धुमाकूळ घातला आहे.
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरूच
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरूचSaam Tv

मुंबई : सध्या महाराष्ट्रात Maharashtra मुसळधार पाऊसाने Heavy Rain चांगलंच धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत कर्नाटक Karnataka किनारपट्टीपर्यंत मागील ३ ते ४ दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे कोकण विभाग व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. ठाण्यात पाऊसाने दमदार हजेरी लावली आहे.

यामुळे अनेक भागामध्ये घरात पाणी शिरले आहे. लोकांची देखील या पाऊसाने Rain चांगलीच तारांबळ उडाली आहे. नदीवर पाण्याचे पूर वाहत असतानाची दृश्ये पाहायला मिळत आहे. मुंबई Mumbai मध्ये तलावात पाण्याची पातळी अधिकच वाढली आहे. मुंबईमधील अनेक विहार ओसंडून वाहत आहे.

हे देखील पहा-

कल्याणमध्ये Kalyan आता पर्यंत ३६८ मिमी तर भिवंडी Bhiwandi इथं ३०० मिमी आणि अंबरनाथ या ठिकाणी २५३ मिमी व ठाण्यात Thane १५९ मिमी पाऊसाची नोंद करण्यात आली आहे. मराठवाड्याच्या काही भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. कोकणात देखील पाऊसाचा जोर वाढतच आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि रायगड या पाच जिल्ह्यांना २१ जुलै आणि २२ जुलै पर्यंत रेड अर्लट दिला आहे, तर, मुंबईला देखील आता रेड अर्लट दिला आहे.

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरूच
मुसळधार पावसाने महाबळेश्वर-पाचगणीचे रस्ते झाले जलमय!

मुंबई- ठाण्यात २२ जुलैला आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्य़ांत देखील घाट क्षेत्रात मध्ये याच काळात जोरदार आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय, उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील हलका आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता देखील सांगण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com