Maharashtra Kesari News: कल्याणचा झेंडा अभिमानानं फडकला; महिला महाराष्ट्र केसरीत कल्याणची वैष्णवी ठरली उपविजेती

Maharashtra Kesari second runner up vaishnavi patil : स्पर्धेत कल्याणच्या मातीतील वैष्णवी पाटील उपविजेती ठरली आहे.
mahila maharashtra kesari vaishnavi patil
mahila maharashtra kesari vaishnavi patil

अभिजीत देशमुख

Maharashtra Kesari News Update : सांगलीमध्ये रंगलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धांमध्ये सांगलीच्या प्रतीक्षा बागडी हिने बाजी मारली आहे.तर या स्पर्धेत कल्याणच्या मातीतील वैष्णवी पाटील उपविजेती ठरली आहे. वैष्णवी पाटील उपविजेती ठरल्यानंतर आनंद व्यक्त केला. तसेच तिच्या सहकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला. (Latest Marathi News)

पुरुष पैलवानाच्या बरोबरीनेच महिलासाठी देखील महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करत मराठी मातीतल्या कुस्ती या खेळात मुलींना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न प्रथमच आयोजन करण्यात आले होते. महिला कुस्तीगीरासाठी सांगली येथे आयोजित पहिल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कल्याणच्या मातीतील वैष्णवी पाटील हीने सांगलीतील (Sangli) प्रतीक्षा बागडी यांच्यात अंतिम सामना रंगला.

mahila maharashtra kesari vaishnavi patil
Maharashtra Kesari News : मैदान मारलं! प्रतीक्षा बागडी ठरली पहिली 'महिला महाराष्ट्र केसरी'

आपल्या तालुक्यातील पैलवान केसरीच्या फायनलमध्ये गेल्याचे समजताच कल्याण नंदिवली जय बजरंग तालमीतील तिचे सहकारी तिच्या प्रशिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. तिच्या लढतीकडे सर्वजण सकाळपासून डोळे लावून बसले होते. सामना सुरू झाला..दोघींना चार-चार पॉइंट होते, मात्र प्रतीक्षाने डाव खेळला आणि वैष्णवीचा पराभव झाला.

'वैष्णवी या सामन्यात पराभूत झाली असली तरी पूर्ण क्षमतेने खेळली व पहिल्याच केसरी स्पर्धेत अंतिम सामन्या पर्यंत धडक दिली. त्यामुळे आम्हाला तिचा अभिमान आहे वैष्णवी हरली असली तरी तिने चांगली लढत दिली. या आधी देखील तिने अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. येथून पुढे ती पुन्हा जिंकेल, असा विश्वास तिच्या प्रशिक्षकांनी बोलून दाखवला. यावेळी वैष्णवीच्या प्रशिक्षकांनी तिच्या सहकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला.

वैष्णवी पाटील मूळची अंबरनाथची

वैष्णवी अंबरनाथ (Ambernath) तालुक्यातील मंगरूळ या गावची आहे. लहानपणापासूनच तिलाच नव्हे तर आई वडिलांना देखील कुस्तीची विशेष आवड होती.. म्हणूनच

वैष्णवीच्या कुटुंबीयांनी तिला कुस्तीसाठी प्रोत्साहन दिलं. वैष्णवी पाटील हिने कल्याणमधील नांदीवली गावातील जय बजरंग तालमीत पंढरीनाथ ढोणे, वसंत साळुंखे ,सुभाष ढोणे, प्रज्वलदीप ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीच धडे गिरवले.

mahila maharashtra kesari vaishnavi patil
Cricket News: Asia Cup चे आयोजन पाकिस्तानात! टीम इंडिया स्पर्धेतून घेणार माघार?

आतापर्यंत तिने सहा ते सात राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत . आपल्या तालुक्यातील पैलवान केसरीच्या फायनल मध्ये गेल्याचे समजताच तालमीतील तिचे सहकारी तिच्या प्रशिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. तिच्या लढतीकडे सर्वजण सकाळपासून डोळे लावून बसले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com