
Laxmi Co operative Bank Update News| मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) गुरुवारी महाराष्ट्रातील लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे. सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्याचे कारण आरबीआयकडून देण्यात आले आहे. प्रत्येक ठेवीदाराला पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम (डीपॉझिट इंश्युरन्स क्लेम रक्कम) मिळू शकणार आहे.
आरबीआयनुसार, बँक (Bank) सध्याच्या आर्थिक स्थितीत आपल्या ठेवीदारांना पैसे परत करू शकणार नाही. बँकेला कामकाज करू दिले तर, ग्राहकांच्या हिताचे नुकसान होऊ शकेल, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
आरबीआयचे (RBI) हे आदेश आजपासून लागू असणार आहेत. आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, तात्काळ प्रभावाने लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेला बँकिंग व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यात इतर बाबींव्यतिरिक्त ठेवी स्वीकारणे आणि ठेवीची परतफेड करणे आदींचा समावेश आहे.
सोलापुरातील लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने प्रशासकाची नेमणूक केली होती. त्यानंतर पाच लाख रुपयांच्या आतील रक्कम असलेल्या ग्राहकांना त्यांचे पैसे दिले जाणार होते. त्यासाठी जवळपास सव्वा महिन्यांची मोहीम राबवण्यात आली होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.