महाराष्ट्र विधीमंडळ समिती जालना दौऱ्यावर; विकास कामांची प्रत्यक्ष करणार पाहणी...

महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समिती विविध विभागांच्या विकास कामांच्या तपासणीसाठी येत्या दोन ते चार डिसेंबर जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.
महाराष्ट्र विधीमंडळ समिती जालना दौऱ्यावर; विकास कामांची प्रत्यक्ष करणार पाहणी...
महाराष्ट्र विधीमंडळ समिती जालना दौऱ्यावर; विकास कामांची प्रत्यक्ष करणार पाहणी...लक्ष्मण सोळुंके

जालना: महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समिती विविध विभागांच्या विकास कामांच्या तपासणीसाठी येत्या दोन ते चार डिसेंबर जालना जिल्ह्याच्या (Jalna District) दौऱ्यावर येत आहे. महसूल, वन, मदत आणि पुर्नवसन, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, औषधी, उद्योग, उर्जा, कामगार, पर्यावरण, वातावरणातील बदल, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी, नगर परिषद, जलसंपदा, कृषी, मत्स्य व्यवसाय, ग्रामविकास, गृह, सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता या सगळ्या विभागाच्या विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी (inspection) ही समिती  करणार आहे. (Maharashtra Legislative Committee visits Jalna; Direct inspection of development works)

हे देखील पहा -

आ. रणजीत कांबळे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत विधानसभा व विधान परिषदेचे एकूण  तीस आमदार सदस्य आहेत आणि विविध खात्याचे अठ्ठावीस सचिव समितीच्या सोबत असणार आहे. अंदाज समितीच्या दौर्‍याचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आला असून गुरूवार, दोन डिसेंबर रोजी सकाळपासून विविध विकास कामांच्या तपासणीचे काम सुरू होईल यात प्रामुख्याने महसूल, अन्न नागरी पुरवठा, औषधी विभागाच्या कार्यालयास व प्रकल्पास भेटी दिल्या जाणार आहेत.

शुक्रवार तीन डिसेंबर रोजी जालना, अंबड, बदनापूर, जाफ्राबाद आणि घनसावंगी नगर परिषद व नगर पंचायतीच्या कामांची पाहणी करण्यात येणार आहे. तर शनिवार चार डिसेंबर रोजी परतूर व मंठा तालुक्यातील जलसंपदा, नगर परिषद, पाणी पुरवठा व स्वच्छता या विभागातील कामाला समिती भेट देणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या या सगळ्या पार्श्वभूमीवर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. सोमवारी दिवसभर विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी विकासाच्या कामांचा आढावा घेतला.

महाराष्ट्र विधीमंडळ समिती जालना दौऱ्यावर; विकास कामांची प्रत्यक्ष करणार पाहणी...
अवकाळी पावसाचा वीटभट्ट्यांनाही फटका; पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी...

अंदाज समितीच्या दौर्‍याच्या पूर्वतयारीसाठी काही अधिकाऱ्यांना विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. कोणती विकास कामे समितीच्या सदस्यांना दाखवायची या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यात आली. सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना जय्यत तयारी करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com