राज ठाकरेंच्या सभेतील गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार नाही : बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSaam Tv

संगमनेर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची जाहीर सभा आज मराठवाडा सांस्कृतिक मंडळात होणार आहे. मशिंदीवरील भोंगे ३ मे पर्यंत उतरवण्याचा अल्टिमेटम राज ठाकरेंनी राज्य सरकारला (Maharashtra Government) दिला होता. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये राज यांची तोफ धडाडणार आहे. या सभेसाठी मनसैनिकांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली असून हजारोंच्या संख्येने मनसैनिक सभेसाठी पोहचत आहेत. तसेच सभास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींमुळं राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून विरोधी पक्षाने राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही राज यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांच्या सभेला होणाऱ्या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होणार नाही. असं म्हणत थोरात यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

Balasaheb Thorat
धोनी, विराट आणि रोहित शर्माला एकाच दिवशी मिळालं मोठं गिफ्ट!

नेमकं काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

महाराष्ट्रदिनीच महाराष्ट्रात मदभेद सुरू आहेत. मतांची विभागणी करून मतदान मिळवणार्‍यांना जनता माफ करणार नाही. जनतेने या राजकारण्याकडे आपली फसवणूक करुन घेवू नये. तसेच राज ठाकरेंच्या सभेला जी गर्दी होतेये ती मतांमध्ये परिवर्तीत होणार नाही. तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, ही जबाबदारी जो नेता म्हणून मिरवतो त्याचीही असते.

औरंगाबादमध्ये २ हजार पोलिसांचा बंदोबस्त

राज ठाकरे यांची सभा रात्री ८ वाजता सुरू होणार आहे. या सभेत राज ठाकरे कुणाला टार्गेट करणार? सभेत काय बोलणार, याचीच उत्सुकता मनसे कार्यकर्त्यांसह विरोधकांनाही लागली आहे. यावेळी राज ठाकरेंच्या सभेला कडेकोट बंदोबस्तदेखील ठेवण्यात आला आहे. यामध्ये ३ डीसीपी ६ एसीपी, ३० पीआय, इतर ३०० अधिकारी आणि २ हजारपेक्षा अधिक पोलीस कर्मचारी तैनात असतील. सोबतच औरंगाबाद ग्रामीण, जालना, अहमदनगर, पुणे यासह गरज पडल्यास इतर जिल्ह्यांमधूनही पोलिसांची कुमक मागवली जाण्याची शक्यता आहे.

Edited By- Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com