मोदींचा आशीर्वाद पंकजाताईंच्या पाठीशी राहू द्या; समर्थकांचं महादेवाच्या चरणी साकडं
बीड : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने (BJP) आपल्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नावाचा समावेश करण्यात आला नाही. हा पंकजा मुंडेंसाठी हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे यांचे नाव डावलण्यात आल्यानंतर त्यांचे समर्थक नाराज झाले. औरंगाबादेत गुरूवारी पंकजा यांच्या समर्थकांनी भाजप कार्यालयावर दगडफेकही केली. (Pankaja Munde Latest News)
भाजपाचे नेते हे ओबीसी नेतृत्वाला संपवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. इतकंच नाही तर, सोशल मीडियावर नाराजी दर्शवत, ताई नाही, अशा प्रतिक्रिया भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहे. दरम्यान, आज पंकजा मुंडे यांच्या समर्थकांसह बीडमधील भाजप कार्यकर्ते या रागातून अखेर बाहेर पडले आहेत.
बीडमध्ये आज पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो समोर ठेवून, बीडचं आराध्य दैवत असणार्या कंकालेश्वर महादेवाला मुंडे समर्थकांनी दुग्धाभिषेक घातला आहे. पंकजा मुंडे यांच्यावर कृपादृष्टी राहू दे. असं म्हणत मुंडे समर्थकांनी महादेवाला साकडं घातल आहे. यावेळी कांकलेश्वर मंदिरासह परिसरात कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. दरम्यान यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासारखी कार्यकर्त्यांनी देखील सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं.
भाजपकडून सारवासारवीची भूमिका
दरम्यान पंकजा मुंडे समर्थकांच्या उद्रेकानंतर प्रदेश भाजपा स्तरावरील नेत्यांकडून सारवासरवीचे प्रयत्न होताना दिसत आहे. पंकजा यांना पक्षात मोठे स्थान मिळेल असे संकेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. तर काही वेळा सल्पविराम असतो, पुढे कारकिर्द मोठीच असते असेही ते म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा देवूनही पंकजा यांना विधान परिषदेची उमेदवारी का देण्यात आली नाही, हेही स्वपक्षीयांना पडलेले कोडेच आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.