मशिदींवरील भोंगे सात दिवसांच्या आत काढून टाका, अन्यथा...; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गर्भीत इशारा

मशिंदींवरील भोंगे हटवण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अल्टिमेटम देण्यात आला आहे.
Loudspeaker on mosque Controversy
Loudspeaker on mosque ControversySaam Tv

तबरेज शेख

नाशिक : राज्यात मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मनसेने मशिदीवरील भोंगे हटवण्याची मागणी तत्कालीन ठाकरे सरकारकडे केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. आता ठाकरे सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार नव्याने स्थापन झालं आहे. अशातच आता पुन्हा एकदा मशिंदीवरील भोंग्यावरून (loudspeaker on mosque) मनसे आक्रमक झाली आहे.

न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे आणि हे भोंगे सात दिवसांच्या आत काढून टाकावेत. अन्यथा मशिंदीसमोर मनसे स्टाईल आंदोलन (mns strike) करण्यात येईल आणि भोंग्यांच्या दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण केले जाईल, असा इशारा नाशिकचे मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी दिला आहे. (Maharashtra Navnirman Sena latest News update)

Loudspeaker on mosque Controversy
Mumbai News : अबब... तब्बल ४७ कोटींचे सोने-चांदी जप्त; मुंबईत ईडीची मोठी कारवाई

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मनसेने पुन्हा एकदा 'मिशन मशिदींवरील भोंगे' सुरू केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चार महिन्यांपूर्वी मशिदीवरील भोंग्यांच्या प्रश्नावरून आंदोलन केलं होतं. त्यानंतर भोंग्याचा आवाज कमी झाला होता. मात्र, श्रावण मास आणि गणेशोत्सवात या भोंग्याचा आवाज पुन्हा वाढला आहे. त्यामुळे समाजातील काही घटक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप मनसेनं केला आहे.

Loudspeaker on mosque Controversy
'वेदांता'नंतर महाराष्ट्राला दुसरा धक्का; आणखी एक प्रकल्प गुजरातला पळवला!

पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्याचा आवाज कमी करावा, अशी मागणी नाशिकच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे केली आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे आणि हे भोंगे सात दिवसांच्या आत खाली उतरवावे, अन्यथा महाराष्ट्र निर्माण सेना स्टाईल तीव्र आंदोलन केले जाईल. तसेच मशिदींसमोर भोंग्यांच्या दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण केले जाईल, असा इशाराही यावेळी मनसेने दिला आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com