MNS Video: 'बाळासाहेब म्हणाले आता जा..' शिवसेना सोडताना हिंदुह्रदयसम्राट अन् राज ठाकरेंचा 'तो' किस्सा; मनसेने शेअर केला खास Video

Balasaheb Thackeray Jayanti: हिंदुह्रयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हा खास व्हिडिओ मूक संवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात असा कॅप्शन देत शेअर करण्यात आला आहे.
Raj Thackeray And Balasaheb Thackeray
Raj Thackeray And Balasaheb ThackeraySaam Tv

Raj Thackeray: हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. तमाम शिवसैनिकांचे दैवत असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांना सोशल मीडियावरुन देशभरातील अनेक नेत्यांनीही अभिवादन केले आहे.

यामध्ये मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा एक ह्रदयस्पर्शी व्हिडिओ मनसेकडून शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी शिवसेना सोडतानाचा त्यांचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा संवाद सांगितला आहे. (Balasaheb Thackeray Birth Anniversary)

Raj Thackeray And Balasaheb Thackeray
Nashik News : सातपूरच्या युवकाचा पंचवटीत खून

गेल्यावर्षी २३ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबईमध्ये रविंद्र नाट्यमंदिरात मनसेचा मेळावा पार पडला होता. यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्या आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना सोडण्यावेळेचा संवाद आपल्या भाषणात सांगितला होता. हाच खास व्हिडिओ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आपल्या ट्विटर हॅंडलवरुन शेअर केला आहे.

राज ठाकरे शिवसेना सोडल्यावर बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले, काय होती त्यांची प्रतिक्रिया हे या व्हिडिओमधून सांगितले आहे.

Raj Thackeray And Balasaheb Thackeray
Tamil Nadu : मंदिरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान अपघात, क्रेन उलटल्याने चौघांचा मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO समोर

काय होता तो किस्सा...

“मला आजही ती गोष्ट आठवते की जेव्हा बाळासाहेबांना कळलं, हा काही राहत नाही पक्षात आता. माझी शेवटची भेट होती. मी आजपर्यंत कधी बोललो नाही तुमच्याशी ही गोष्ट. निघताना माझ्यासोबत मनोहर जोशी होते. मनोहर जोशी बाहेर गेलेले रुमच्या. रुमच्या बाहेर गेल्यावर माननिय बाळासाहेबांनी मला बोलावलं. असे हात पसरले माझ्यासमोर (दोन्ही हात पसरवून दाखवत). मला मिठी मारली. आणि म्हणाले आता जा…त्यांना समजलं होतं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत अकाउंटवरुन ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत "जा लढ, मी आहे... काही मूक संवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात. राजसाहेबांचा (Raj Thackeray) वंदनीय बाळासाहेबांशी अखेरचा 'राज'कीय संवाद," असा कॅप्शनही दिला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com