Electricity Bill : सर्वसामान्यांना मोठा झटका; लाईट बिल तब्बल २०० रुपयांनी महागणार

आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांची आणखी एक चिंता वाढवणारी बातमी आहे.
Electricity Bill
Electricity BillSaam tv

Electricity Bill Hike : आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांची आणखी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी सिलेंडरनंतर आता घरगुती वापराची वीज सुद्धा महागणार आहे. राज्यात विजेच्या दरात किमान ६० पैसे प्रतियुनिट वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्याचे वीज बिल किमान २०० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

Electricity Bill
Petrol Diesel Price : सलग दुसऱ्या दिवशी कच्चा तेलाचे दर घसरले; पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग?

कोळसाटंचाई, त्यामुळे आयात करावा लागणारा कोळसा, त्यातून वाढलेला वीजनिर्मिती खर्च, बाहेरून खरेदी करावी लागलेली वीज, क्रॉस सबसिडीच्या रूपात मिळालेले कमी अनुदान अशा कारणांमुळे ‘महावितरण’चा वीज खरेदी खर्च खूप वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विजेच्या दरात (Electricity Bill) वाढ होण्याची शक्यता आहे.

याआधीच राज्य सरकारने राज्यात विजेच्या दरात १० ते २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आता नोव्हेंबर महिन्यात पुन्हा दरवाढ होणार आहे. दरम्यान, वीज खरेदी खर्चातील वाढीपोटी महावितरणने १५०० कोटी रुपये राखीव ठेवले होते. मात्र, तो निधी २०२१ मध्येच संपला असल्याची माहिती आहे. त्यामुळे महावितरणने १ एप्रिल २०२२ मध्ये खरेदीच्या वाढीपोटी इंधन समायोजन शुल्क आकारण्यास सुरुवात केली.

Electricity Bill
Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट; कुटुंबीयांनी दिलं स्पष्टीकरण

दरम्यान, उन्हाळ्यात वीजेची मागणी वाढली असताना कोल इंडियाकडून फक्त २० टक्के कोळसा पुरवण्यात आला होता. त्यामुळे महानिर्मितीला बाहेरून कोळसा खरेदी करावा लागला. त्यासाठी 20 हजार कोटींचा खर्च आला. तसंच क्रॉस सबसिडीतील पैसादेखील कोरोना काळात मिळाले नाही. त्यामुळे आणखी 20 हजार कोटींचे नुकसान झाले आहे, त्यामुळे किमान 40 हजार कोटींच्या घरात नुकसान झाले आहे, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com