
Ramdas Kadam News : रत्नागिरीमधील खेडच्या गोळीबार मैदानात शिवसेनेने जंगी सभा आयोजित केली. या सभेत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खेडमधील भाषणात रामदास कदम यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. 'एकदिवस नक्की समोर येईल की, कुणाचे सिंगापूर, श्रीलंका, अमेरिकाला कुणाचे हॉटेल आहेत, असं म्हणत शिवसेना नेते रामदास कदम यांनी भरसभेत सर्वच उघड केलं. (Latest Marathi News)
शिवसेनेने खेडच्या गोळीबार मैदानात जाहीर सभा आयोजित केली. ठाकरेंच्या सभेला गोळीबार मैदानातील सभेतून 'करारा जबाब' दिला जाणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. याच सभेत रामदास कदम यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
रामदास कदम म्हणाले, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून अनेकांचे संशोधन सुरू आहे. ते उठतात कधी जेवतात कधी. माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवावं लागत नाही. योगेश कदम यांनी दाखवून दिलं. 'मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेला बाळासाहेबांनी जन्म दिला, हे वाक्य उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलतात'.
'काँग्रेसच्या दावणींला बांधली गेली की, मी शिवसेना बंद करीन, असेही बोलले होते. भास्कर जाधव,पाहा शिवाजी पार्कही आज कमी पडलं असतं. दसऱ्यालाच खरी शिवसेना कुणाचीही हे स्पष्ट झालं. सोनिया गांधीसोबत शिवसेना कधी जाणार नाही, असे बाळासाहेब बोलले होते. मग विचारांची गद्दारी तुम्ही का केली? असा सवाल रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला.
'मी दापोलीची जागा मागत होतो. मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून तुम्ही मला पाडलं. मी शपथ घेऊन सांगतो, उद्धव ठाकरेंनी योगेश कदम यांनाही पाडण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे मला ४ वर्ष भेटले नाहीत . योगेश यांनाही भेटले नाही. मी काय वाकडे केले होते, असेही कदम म्हणाले.
'नारायण राणेंना आम्ही अंगावर घेतले. बाळासाहेबांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, त्याची ही परतफेड केली. मला कायम तिसऱ्याच जिल्ह्याचा पालकमंत्री केला. नंतर कलेक्शनसाठी हा गद्दार एपी आला, असेही रामदास कदम पुढे म्हणाले.
'बाळासाहेब हे रामदास कदमसारखे वाघ पाळायचे. तुम्ही सुभाष देसाईंसारखी शेळी पाळता हा फरक आहे. २० आमदारांना आपण घालवलं. मी मागच्या वेळी कडवटं बोललो. माझे पोस्टर लावले. अफझलखान आला होता, तसे उद्धव ठाकरे आले. दापोलीत रामदास कदमांवर चाल करून, कोकणातली जनता आपल्यासोबत नाही हे नागरिक सांगत आहेत, असे कदम पुढे म्हणाले.
'तुम्ही सांगता माझे हात खाली आहेत. मग मिठाईचे खोके दिलेत ते कुठे गेले? एकदिवस नक्की समोर येईल कुणाचे सिंगापूर, श्रीलंका, अमेरिकेला कुणाचे हॉटेल आहेत. खोकेच्या खोके वाटून याच रामदास कदमांनी तुमची मराठवाड्यात उंची वाढवली, असा आरोप कदम यांनी केला.
'आम्ही मरेपर्यंत कधीही डाग लावून देणार नाही. कोकणातले अनेक प्रस्ताव आपल्याकडे आहेत. पत्रकारांनी एकदा गर्दी पहावी. आणि उद्धव ठाकरेंना दाखवावी. आमच्यासमोर कोण उभं राहिलं तर त्याला गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असाही इशारा कदम यांनी दिला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.