एकनाथ शिंदेंच्या नाराजीनाट्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आले चर्चेत; नेमकं काय आहे कारण ?

एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यानंतर विनोदांनी अक्षरश: जाण आणली आहे. तर मंगळवारी सकाळपासून राज्यपाल कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांच्यावरील मीम्स देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Bhagat Singh Koshyari And eknath Shinde
Bhagat Singh Koshyari And eknath Shinde Saam Tv

मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर राज्याचा राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे नेते मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व नाराज आमदारांना घेऊन गुजरातच्या सुरत येथे गेले आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदे यांच्या नाराजीनाट्यानंतर पहाटेच्यावेळी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात अक्षरश: हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे. दुसरीकडे व्हॉटस्अॅप , फेसबुक, ट्विटरवर भन्नाट विनोदी मीम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या विनोदांनी अक्षरश: जाण आणली आहे. तसेच मंगळवारी सकाळपासून राज्यपाल कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांच्यावरील मीम्स देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ( Maharashtra Political Crisis News In Marathi )

Bhagat Singh Koshyari And eknath Shinde
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर 'सत्तेबाबत' राज ठाकरेंचं ट्वीट व्हायरल

"शिंदे साहेब, कमलीच्या नादाला लागू नका', ""गद्दारांना क्षमा नाही', "ज्या सुरतेची लुट मराठ्यांनी केली, त्याच सुरतेत तुम्ही सत्तेसाठी शरण गेलात', "मामू ला झोपेतुन उठू दे', "सिलॅबसच्या बाहेरचा पेपर मविआला आलाय वाटत' इथपासून ते "दूध,चहापावडर जास्त आणून ठेवा, राज्यपालांच्या स्टाफला सुचना', अशा भन्नाट मीम्स्‌नी मंगळवारी दिवसभर नेटकऱ्यांचे अक्षरशः मनोरंजन केले.

मंगळवारी सकाळपासून राज्यातील घडामोडीला वेग आला आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर भन्नाट मीम्स, टीका-टिपण्णी, विनोद हे एकनाथ शिंदे यांच्यावर सुरू झाले आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरील मीम्स देखील चर्चेत आले आहेत. 'दूध आणि चहा पावडर जास्त आणून ठेवा- राज्यपाल यांच्या स्टाफला सुचना' या नर्मविनोदी शैलीतील मीम्सने अक्षरशः हास्यकारंजी उडविली आहे.

Bhagat Singh Koshyari And eknath Shinde
एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांना विमानाने अमित शहांकडे नेणार?

शिंदे यांच्या ट्‌विटरवरील संदेशानंतर "शिंदे साहेब उद्धव साहेब यांच्यानंतर तुम्हीच मुख्यमंत्री होणार होता, कमलीच्या नादाला लागू नका' असे भन्नाट पण विचार करायला लावणारे ट्‌विट एका शिवसैनिकाने केले. "बरं, मग आता काय फडणवीसांची शिकवणी लावणार का ?', देवेंद्र फडणवीस व शिंदे यांच्या एकत्रीत छायाचित्रावर "हे बघा साहेब एअरप्लेन मोडवर टाकला मोबाईल', एकनाथ शिंदे यांनीच पुरस्कृत केलेला "धर्मवीर' चित्रपटातील "एकनाथ कुठाय'अशा आशयाचे अनेक भन्नाट मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com