Bacchu Kadu : बंडखोरीचं गोड फळ?, ठाकरे सरकार कोसळताच बच्चू कडूंची फाईल बंद!

बच्चू कडू यांना एका गैरव्यवहार प्रकरणी क्लीन चीट मिळाली आहे.
Bacchu kadu
Bacchu kadu Saam Tv

मुंबई : गेल्या ८ ते १० दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या नाट्यावर अखेर पडदा पडला. भावनिक आवाहन करून सुद्धा शिंदे (Eknath Shinde) गटाने बंड सुरू ठेवल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला. ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे ठाकरे सरकारवर नामुष्की ओढावली. शिंदे गटात आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचाही समावेश होता. एकाबाजूला ठाकरे सरकार कोसळलं आणि दुसरीकडे बच्चू कडू यांना एका गैरव्यवहार प्रकरणी क्लीन चीट मिळाली आहे. (Bacchu Kadu Latest News)

Bacchu kadu
Eknath Shinde Latest News: शिंदे गटातील 'या' नेत्यांना मिळणार मंत्रिपदी बढती

बंडखोर आमदारांमध्ये सामील असलेल्या बच्चू कडू यांना एका गैरव्यवहार प्रकरणी अकोल्यात क्लीन चिट देण्यात आली आहे. रस्त्याच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप बच्चू कडू यांच्यावर होता. न्यायालयाच्या आदेशानुसार बच्चू कडू यांच्या वर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान बच्चू कडू सध्या एकनाथ शिंदे या गटात असून एक शिंदे गट भाजप सोबत सत्ता स्थापनेत सहभागी होणार आहे.

बच्चू कडूंना रस्ते घोटाळ्यात क्लीन चिट

राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडूं यांना तीन रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणातून क्लीनचीट काल क्लीन चिट मिळाली आहे. अस्तित्वात नसलेल्या तीन रस्त्यांच्या कामात तब्बल एक कोटी ९५ लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप त्यांच्यावर लादन्यात आला होता.

वंचित बहूजन आघाडीच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर हे आरोप झाले होते. हे प्रकरण कोर्टात दाखल करण्यात आलं होतं. न्यायालयाच्या आदेशानंतर सिटी कोतवाली पोलिसांत बच्चू कडू यांच्यावर फसवणूकीचे गुन्हे दाखल झाले. संपुर्ण प्रकरणात पुरावे नसल्यानं प्रकरणच तथ्यहिन असल्याचं कोतवाली पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. या प्रकरणाची फाईल आता अकोला पोलिसांनी बंद केली. (Bacchu Kadu News)

Bacchu kadu
Politics : भाजपने केलं तेच मविआने केलं; नामांतराच्या निर्णयाला अबू आझमींचा विरोध

काय होते नेमके आरोप?

अकोल्यातील जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करून पालकमंत्री बच्चू कडूंनी कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता. दरम्यान जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या १३ कामांना स्थगिती दिल्याने पालकमंत्री कडू यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची मागणी वंचितने केली आहे. यासंदर्भात प्रकाश आंबेडकरांनी ७ फेब्रूवारीला कारवाईच्या परवानगीच्या मागणीसाठी राज्यपालांची भेट घेतली होती.

राज्यपालांच्या पत्रात यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीनं बच्चू कडू यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली. सोबतचं प्रथमश्रेणी न्यायालयाने कलम १५६ (३) नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश बजावले. वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात न्यायालयात अर्जही केला होता. हा अर्ज न्यायालयाने मंजूर करून थेट सिटी कोतवाली पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसासर कडुंवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते.

Bacchu kadu
ईडीच्या वादळात तुमचा आख्खा वाडा उध्दवस्त झाला; राजू शेट्टींचा महाविकास आघाडीतील नेत्यांना टोला

१) गायगाव ते रिधोरा रस्त्याला जोडणारा लहान पुल आणि पोचमार्गाच्या कामात ५० लाखांच्या अपहाराचा आरोप.

२) इतर जिल्हा मार्गाला (इजिमा) जोडणाऱ्या धामना ते नवीन धामना जोड रस्ता सुधारणेच्या कामात २० लाखांच्या अपहाराचा आरोप.

३) कुटासा ते पिंपळोद मार्गाला जिल्हा मार्ग मार्ग दाखवत यासाठी निधी वळता करीत १ कोटी २५ लाखांच्या अपहाराचा आरोप.

बच्चू कडूंनी फेटाळले होते आरोप

वंचितनं यासंदर्भात सर्वात आधी आरोप केल्यानंतर बच्चू कडू यांनी आर्थिक अनियमिततेचे आरोप फेटाळले होते. यासंदर्भात वंचितकडून तांत्रिक बाबींचा आधार घेत गैरसमज पसरवला जात असल्याचं राज्यमंत्री कडू म्हणाले होते. दरम्यान, यासंदर्भात आपले राजकीय मित्र असलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षानं हे आरोप केल्याचं दुःख आहे, असे राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com