Sanjay Raut on NCP : सत्तासंघर्षाच्या निकालाआधी ठाकरे गटाचे बदलले सूर, राष्ट्रवादीच्या प्रश्नावर राऊत असे का म्हणाले?

सत्तासंघर्षाच्या निकालाआधी ठाकरे गटाचे बदलले सूर, राष्ट्रवादीच्या प्रश्नावर राऊत असे का म्हणाले?
Sanjay Raut
Sanjay Raut saam tv

Sanjay Raut on NCP : सत्तासंघर्षाच्या निकाल आता कोणत्याही क्षणी येऊ शकतो. मात्र निकालाआधीच ठाकरे गटाचे सूर बदलले आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच कारण ही तसेच आहे. एकेकाळी महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीच्या बाजूने बोलणारे ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीच्या मुद्द्यांना खोडताना दिसत आहेत.

Sanjay Raut
Cji Dy Chandrachud Maharashtra Connection : न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे महाराष्ट्राशी काय आहे नाते? जाणून घ्या

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil Latest News) यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. त्यांना ईडीने चौकशीसाठी सोमवारी हजर राहण्यास सांगितलं आहे. यातच आज राऊतांनी नेहमीप्रमाणे सकाळी पत्रकार परिषद घेतली. (Latest Marathi News)

यावेळी पत्रकारांनी राऊतांना जयंत पाटील यांच्या ईडीच्या चौकशीबाबत प्रश्न विचारला. त्यावर बोलताना ते म्हणाले आहेत की, ''राष्ट्रवादीचे प्रवक्ते त्यावर प्रतिक्रिया देतील. मी काहीही बोलणार नाही.'' त्यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गट आणि राष्ट्रवादीत सर्व काही ठीक आहे की नाही? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी व्यक्त केलेली भूमिका चर्चेत आली होती.

Sanjay Raut
SC Hearing On Maharashtra Political Crisis : ''16 नाही 39 आमदार अपात्र ठरणार''

त्यानंतर पवारांनी देखील आपण सामनाला फारसं गांभीर्यानं घेत नसल्याचे म्हटले होते. तेव्हापासून राऊत आणि महाविकास आघाडी यांच्यात फारसं आलबेल नसल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

यातच आज सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होणार आहे. हा निकाल ठाकरे गटाच्या विरोधात लागला तर महाविकास आघाडी कायम राहणार का? अशी चर्चाही आता रंगू लागली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com