Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?; शिंदे सरकारमधील मंत्री म्हणाले, मी अत्यंत जबाबदारीने...

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होण्याचे संकेत शिंदे सरकारमधील मंत्र्यांनी दिले आहेत.
Maharashtra Political Crisis, Devendra Fadnavis and Eknath Shinde
Maharashtra Political Crisis, Devendra Fadnavis and Eknath ShindeSAAM TV

अमोल कलये, रत्नागिरी

Minister Uday Samant On Maharashtra Politics : राज्यातील सत्तासंघर्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टात कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असतानाच, महाराष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होण्याचे संकेत शिंदे सरकारमधील मंत्र्यांनी दिले आहेत.

महाविकास आघाडीमधील काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. येत्या काही दिवसांत त्याची महाराष्ट्राला प्रचिती येईल. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक जण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत आणि मी अत्यंत जबाबदारीने हे विधान करत आहे, असे मंत्री उदय सामंत ठामपणे म्हणाले. (Latest Marathi News)

Maharashtra Political Crisis, Devendra Fadnavis and Eknath Shinde
Maharashtra Political Crisis: ... तर उद्धव ठाकरेंना चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळेल; राज्यातील सत्ता संघर्षावर तज्ज्ञांचं मोठं भाष्य

सर्वोच्च न्यायालय योग्य निर्णय देईल- सामंत

राज्यातील सत्तासंघर्ष आणि १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय कधीही येऊ शकतो, असे सांगितले जात आहे. याबाबत उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. १७२ आमदार आमच्या पाठिशी आहेत. आमची बाजू योग्य प्रकारे सुप्रीम कोर्टात मांडली आहे. कोर्ट योग्य तो निर्णय देईल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

संजय राऊत यांना टोला

यावेळी उदय सामंत यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. 'सामना'मधून शरद पवार यांच्याबद्दल लिहिलेल्या वक्तव्यावर नंतर सारवासारव करण्यात आली. महाविकास आघाडीची मोट ज्यांनी बांधली त्या शरद पवार साहेबांनीच सामनावर आणि सकाळी पत्रकार परिषद घेणाऱ्यांबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे त्याचं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे, असा टोला सामंत यांनी राऊतांना लगावला.

Maharashtra Political Crisis, Devendra Fadnavis and Eknath Shinde
Maharashtra Political Crisis:... तर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल; घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं मोठं वक्तव्य

शरद पवार साहेबांना आता संजय राऊत सल्ला द्यायला लागले आहेत, आम्हाला सल्ला देत होते. संजय राऊत यांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राने बघितला आहे. सामनामधून शरद पवार आपला राजकीय वारसा निर्माण करण्यास अपयशी ठरले असे सांगण्यात आलं. दुसऱ्या पक्षात डोकावून बघायचं. आम्ही पूर्वीपासून जे सांगत होतो की यांची दखल घ्यायची आवश्यकता नाही, आता शरद पवार यांनीच तसे सांगितलं. सामना आम्ही वाचत नाही आणि आम्ही त्याची दखल घेत नाही, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांवरील टीकेला प्रत्युत्तर

जी व्यक्ती देशपातळीवर प्रसिद्ध असते, तीच व्यक्ती प्रचारासाठी जाऊ शकते. त्याला कुणाला आदेशाची गरज नसते. शिवसेना भाजपचे सरकार दहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात स्थापन झालं. युतीचे मुख्यमंत्री म्हणून तिथल्या उमेदवारांनी जर प्रचारासाठी बोलावलं असेल, युतीचा धर्म पाळण्यासाठी त्या ठिकाणी जाणं क्रमप्राप्त आहे, याच भावनेतून एकनाथ शिंदे त्या ठिकाणी गेले. कर्नाटकमध्ये गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांना जो प्रतिसाद मिळाला तो अनेकांच्या डोळ्यांमध्ये खुपला. त्यामुळे पुन्हा एकदा पोटशूळ उठलं. एकनाथ शिंदे एसीमध्ये आणि खुर्चीमध्ये बसून कोणाला सल्ला देत नाहीत, एकनाथ शिंदे प्रसिद्ध झाल्याने अनेकांना दुःख होतं. त्यामुळे तेच साडेनऊ वाजता व्यक्त होतं. पण यावर रामबाण उपाय शरद पवार यांनी सूचवला आहे, असेही सामंत म्हणाले.

'यांना खोक्याशिवाय काही दिसत नाही'

दहा महिन्यांत यांना खोक्याशिवाय काही दिसत नाही. यांचे सर्व खोके एकनाथ शिंदे यांनी बंद केले आहेत. त्यामुळे यांना स्वप्नात देखील खोके दिसत आहेत. जे खोके घेत होते, जे महानगरपालिकेमध्ये बोके होते, त्यांचा सर्व चरितार्थ थांबल्यामुळे चीडचीड होत आहे. त्यामुळे या नैराश्यातून सकाळी साडेनऊ वाजता पत्रकार परिषद होत आहे. पण या माध्यमातून मी नितेश राणे यांचे अभिनंदन करतो. संजय राऊत यांची प्रेस झाल्यानंतर दहा वाजता नितेश यांची प्रेस काय असते हे महाराष्ट्राला दाखवण्याचं काम ते करतात. अनेक ठिकाणच्या गोष्टी नितेश राणे बाहेर काढतात, त्यामुळे त्यांचं कौतुक आहे, असे उदय सामंत म्हणाले.

'मोदींवर टीका करताना आत्मचिंतनही करा'

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या विरोधकांना उदय सामंत यांनी उत्तर दिलं. राजकारणामध्ये हार-जीत असते, पण आपली परिस्थिती बघितली पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना आपण कुठे आहोत, याचं आत्मचिंतन आपण करणार आहोत की नाही. जगातले आपण एकमेव प्रवक्ते आहोत, आपण कुणाला सल्ला देतो; आपले आमदार खासदार किती आहेत, त्यामुळे याचं राजकारणात भान असणं आवश्यक आहे, असे उदय सामंत म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com