ठाकरे सरकार संकटात! भाजप हा जादुई आकडा गाठेल ? जागांचे गणित समजून घ्या

एकनाथ शिंदे हे आज सकाळपासून नाॅटरिचेबल राहिल्याने आगामी काळात मविआ सरकारला धाेका निर्माण झाला आहे अशी चर्चा रंगली आहे.
Eknath Shinde News, Maharashtra Politics News, Maharashtra Political Crisis,
Eknath Shinde News, Maharashtra Politics News, Maharashtra Political Crisis, saam tv

मुंबई : राज्यातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार अडचणीत आहे का ? सत्ताधारी शिवसेनेचे (Shiv Sena latest News Updates) मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समवेत सुमारे एक डझन आमदारांनी मुख्यमंत्र्यांविरोधात बंड केले आहे का? महाराष्ट्रात भाजपची (BJP) सत्ता परत येईल का? असे अनेक प्रश्न समाेर आले आहेत. ज्याची आज महाराष्ट्राच्या राजकारणात (maharashtra politics) चर्चा रंगली आहे. दरम्यान सध्यस्थितीत महाराष्ट्रात सरकार (maharashtra government) स्थापनेसाठी किंवा राहण्यासाठी किती संख्या हवी आणि 'बेपत्ता' आमदारांचे (Eknath Shinde latest News) मत बदलल्यास उद्धव ठाकरे सरकारचे काय होईल हे आपण पाहू या. (Maharashtra politics latest marathi news)

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने पाच जागा जिंकल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादी (ncp) आणि शिवसेनेला (shivsena) प्रत्येकी दाेन जागा मिळाल्या तर काँग्रेसच्या (Congress) खात्यात फक्त एक जागा आली. भाजपकडे पुरेसे संख्याबळ नाही, तरीही त्यांचे सर्व पाचच्या पाच उमेदवार जिंकले. या निकालामुळे (maharashtra vidhan parishad election result) भाजपच्या बाजूने क्रॉस व्होटिंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला (mva) हा धक्का मानला जात आहे. या धक्क्यातून ते सावरण्यापुर्वीच आज मविआला एक मोठा धक्का बसला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Marathi news) हे जवळपास 17 ते 18 आमदारांसह गुजरातला गेले. त्यानंतर त्यांचे फाेन नाॅटरिचेबल असल्याची माहिती पुढे आली.

Eknath Shinde News, Maharashtra Politics News, Maharashtra Political Crisis,
एकनाथ शिंदे आणि 'ऑपरेशन लोटस'मागे भाजपच्या महाराष्ट्राच्या या नेत्याचा हात?

शिंदे यांच्यासोबत 25 आमदार असल्याची चर्चा

आज सकाळ पासून माध्यमात येत असलेल्या बातम्यांमधून तसेच सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनूसार एकनाथ शिंदे यांच्या समवेत सुमारे २५ आमदार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घेतलेल्या बैठकीत 55 पैकी 18 आमदार उपस्थित हाेते असेही समजते.

Eknath Shinde News, Maharashtra Politics News, Maharashtra Political Crisis,
Maharashtra Politics : गेम झाल्याचे माझे विधान सेना नेत्याने मनाला लावून घेतले : शिवेंद्रसिंहराजे

शिंदे यांच्यासोबत हे आमदार असल्याची चर्चा

माध्यमांतून तसेच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांमध्ये अब्दुल सत्तार (राज्यमंत्री, सिलोड, औरंगाबाद, शंभूराज देसाई, राज्यमंत्री, सातारा, पाटण, प्रकाश आबिटकर, कोल्हापूर, संजय राठोड, यवतमाळ, संजय रायमुलकर, मेहकर, संजय गायकवाड, बुलढाणा, महेंद्र दळवी, विश्वनाथ भोईर, कल्याण, ठाणे, भरत गोगवले, महाड, रायगड, संदीपान भुमरे, राज्यमंत्री, प्रताप सरनाईक, माजिवडा, ठाणे, शाहजी पाटील सावंत, शांताराम मोरे, श्रीनिवास वनगा , संजय शिरस्त, अनिल बाबर, बालाजी किणीकर, यामिनी जाधव, किशोर पाटील, गुलाबराव पाटील, रमेश बोरनारे, उदय राजपूत यांचा समावेश आहे.

Eknath Shinde News, Maharashtra Politics News, Maharashtra Political Crisis,
Breaking: एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरुन हटवले

'बंडखोर' आमदार भाजपच्या संपर्कात?

शिंदे आणि इतर 'बंडखोर' आमदार गुजरात भाजपचे प्रमुख सीआर पाटील यांच्या संपर्कात असल्याचे समजते. सुरतला पोहोचल्यानंतर आमदारांनी पाटील यांची भेट घेतल्याचे समजते पण त्यास पाटील यांनी दुजाेरा दिलेला नाही. परिस्थितीचे गांभीर्य पाहून महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षही सक्रिय झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची तातडीची बैठक बोलावली हाेती. या बैठकीस सर्व आमदारांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले हाेते. या बैठकीत 55 पैकी 18 आमदार उपस्थित हाेते.

Eknath Shinde News, Maharashtra Politics News, Maharashtra Political Crisis,
राज्याच्या राजकारणात नवीन काही तरी घडणार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याचा अर्थ काय?

सत्तास्थापनेसाठी १४४ आमदारांची गरज

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागा 288 आहेत. म्हणजे बहुमत सिद्ध करण्यासाठी किमान १४४ आमदारांची गरज आहे. ज्यांच्याकडे इतके संख्याबळ जमेल ते सत्ताधारी आघाडीला आव्हान देऊ शकतात. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त आहे. राष्ट्रवादीचे दोन आमदार अनिल देशमुख (anil deshmukh) आणि नवाब मलिक (nawab malik) सध्या कारागृहात आहेत. न्यायालयाने त्यांना राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत मतदानही करू दिले नाही.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 55 आमदार विजयी झाले. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या ५३ आणि काँग्रेसची ४४ आहे. त्यांच्याच बळावर उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

बहुजन विकास आघाडीकडे 3, समाजवादी पक्ष, AIMIM, प्रखर जनशक्ती पक्षाकडे 2-2 आमदार आहेत. मनसे, सीपीएम, शेकाप, स्वाभिमान पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, जनसुराज शक्ती पक्ष, क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे १-१ आमदार आहेत. याशिवाय 13 आमदार अपक्ष आहेत.

भाजपचे 106 आमदार आहेत. त्यांना काही (डझनभर) अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचेही सांगितले जात आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाेबत सध्या 25 आमदार असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्वांनी भाजपला साथ दिल्यास भाजप सत्तेसाठी आवश्यक असणारा जादुई आकड्यापर्यंत पाेहचेल.

दरम्यान महाराष्ट्रात भाजपने सत्ता स्थापन केल्यास विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात मंत्रीपद तर एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनण्याची संधी असल्याची चर्चा राज्यातील राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com