Beed : 'राज्यापालांची काळी टोपी आणा, एक लाख रुपये मिळवा'; ठाकरे गटाने जाहीर केले बक्षीस

शिवसेनेच्या ठाकरे गटाचं बक्षीस सध्या राज्यात लोकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyari Saam tv

Beed News : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वक्तव्य केल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. विरोधी पक्षातील काही नेत्यांकडून राज्यपाल यांची पदावरून हकालपट्टीची मागणी होत आहे. तर बीडमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने चक्क राज्यपालांची काळी टोपी घेवून येणाऱ्याला व्यक्तीला एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचं हे बक्षीस सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. (Latest Marathi News)

Bhagat Singh Koshyari
Satara News : उदयनराजेंना सल्ला द्यायला ते साताऱ्यात असतात कधी? पेपरबाजी करायची अन् गायब व्हायचं; शिवेंद्रराजेंची जोरदार टोलेबाजी

छत्रपती शिवाजी महाराजांवर वक्तव्य केल्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांकडून कोश्यारी यांच्यावर टीकेचा भाडीमार होत आहे. बीडमध्ये (Beed) देखील शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून बीडमध्ये भगत सिंह कोश्यारी यांच्या विरोधात जोडो मारो आंदोलन केले.

यावेळी 'राज्यपालांची काळी टोपी आणा, एक लाख रुपये मिळवा' असं बक्षीस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी घोषणा केली. तसेच यावेळी ठाकरे गटाने भाजप विरोधातही तीव्र घोषणाबाजी केली.

Bhagat Singh Koshyari
काँग्रेसने भगतसिंग यांची फाशी थांबवण्यासाठी काय केले? सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल

औरंगाबादेत राज्यपालांच्या विरोधात आंदोलन

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्याच्या विरोधात ठाकरे गटाकडून औरंगाादेत देखील आंदोलन करण्यात आले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

'महाराष्ट्राचा आणि महापुरुषांचा वारंवार अपमान करणाऱ्या राज्यपालांना जोपर्यंत हटवणार नाही; तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. हिमालयातून आलेल्या पार्सलला हिमालयात पाठवा, अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि आमदार मनीषा कायंदे यांनी केली. औरंगाबाद शहरातील क्रांती चौकामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने राज्यपालांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com